बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून घेतली निवृत्ती

मुंबई  | भारतीय संघाचे आक्रमक फलंदाज युसूफ पठाणने आज क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे. युसूफ पठाण भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाणचा मोठा भाऊ आहे. त्याने दोन वेळा विश्वचषक जिंकवला आहे. युसूफने दोन वेळा कोलकाता नाईट रायडर्स सोबत इंडियन प्रीमियर लीग जिंकली होती.

“मी माझ्या कुटुंबाचे, मित्रांचे, चाहते, संघ, प्रशिक्षक आणि संपूर्ण देशाने मला पाठिंबा आणि प्रेम दिले त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार मानतो. आज माझ्या आयुष्यातील या खेळीला पूर्ण विराम देण्याची वेळ आली आहे. मी सर्व प्रकारच्या खेळामधून निवृत्ती जाहीर केली आहे. भारतासाठी दोन विश्वचषक जिंकणे आणि सचिन तेंडुलकरला खांद्यावर घेऊन जाणं हे माझ्या कारकिर्दीतील अविस्मरणीय क्षण होते.

2007 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून युसूफने 57 एकदिवसीय आणि 22 टी-20 सामने खेळले आहेत. आयसीसी टी-20 विश्वचषक 2007 आणि आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2011 जिंकणार्‍या भारतीय संघाचा तो भाग होता.  टी-20 मध्ये पॉवर हिटर म्हणून ओळखला जाणारा युसूफ सर्वात प्रभावी होता. टी-20 सामन्यात त्याने 139.34 च्या स्ट्राईक रेटने 4852 धावा आणि प्रत्येक षटकात 7.63 धावांच्या इकॉनॉमी दराने 99 विकेट्स घेतल्या.

दरम्यान, वेगवान गोलंदाज विनय कुमारनेही क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे. विनय कुमारने सोशल मीडियावर याची घोषणा केली आहे. विनय कुमारने त्याच्या अंतराष्ट्रीय कारकीर्दीत 31 वनडे आणि 9 टी-20 सामने तसेच एक कसोटी सामना खेळला आहे.

थोडक्यात बातम्या –

संजय राठोड समर्थकांकडून गलिच्छ प्रकार सुरु, चित्रा वाघ यांना केलं जातंय टार्गेट!

पुण्यात आजही कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ; जाणून घ्या सविस्तर आकडेवारी

‘…तर 1 मार्च पासून दूध 100 रूपये प्रतिलिटर दराने विकणार’; शेतकऱ्यांचा केंद्र सरकारला इशारा

‘ये बंगाल की प्रमुख जनता है और….’; भाजपमध्येही होत आहे ‘पावरी’, पाहा व्हिडीओ

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात मुख्यमंत्री आणि शरद पवारांकडून अपेक्षा – विनोद तावडे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More