फेसबुकवरुनच एका क्लिकवर मागवा आता खाद्यपदार्थ

Facebook Food
Photo- menuorderapp

मुंबई | फेसबुकने आपल्या वापकर्त्यांना आता थेट आपले पदार्थ फेसबूक पेजवर विक्रीला उपलब्ध करुन देण्याचा पर्याय दिला आहे. त्यामुळे ग्राहकाला आता थेट फेसबुकवरुन खाद्यपदार्थ मागवता येणार आहे. फेसबुकने यासंदर्भात यापूर्वीच घोषणा केली होती.

अमेरिकेच्या ४० शहरांमध्ये या प्रयोगाची चाचणी घेण्यात आली. त्यानंतर आता अनेक मोबाईल वापरकर्त्यांना आता हा पर्याय दिसू लागला आहे. लवकरच प्रत्येक वापरकर्त्याला फेसबुक ही सुविधा प्रदान करणार आहे.