बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मुंबईत लोक मरत आहेत आणि तुम्ही आयपीएल काय खेळताय?’; राखी सावंत भडकली

मुंबई | अभिनेत्री राखी सावंत ‘ड्रामा क्वीन’ म्हणून मनोरंजन विश्वात प्रसिद्ध आहे. ती काही ना काही कारणाने नेहमीच चर्चेत असते. आता राखी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. देशामध्ये सुरू असलेल्या आयपीएलवर राखी भडकली आहे.

देशात कोरोनाने थैमान घातलं आहे. अनेक राज्यांत लॉकडाऊन आहे आणि रोज शेकडो लोक कोरोनामुळे प्राण गमवत आहेत आणि अशात कुंभमेळा व आयपीएलसारखे इव्हेंट साजरे होत आहेत. यावर राखीने आपला संताप व्यक्त केलाय.

मुंबईत लोक कोरोनामुळं मरत आहेत. आणि हे मस्तपैकी आयपीएलचे सामने खेळत आहेत, असं राखी सावंतने म्हटलं आहे. इथे कोणीही नाही सर्वजन मुंबईच्या बाहेर सहलीला गेले आहे. तुम्हाला मी एकटीच मिळेल, असंही राखीने यावेळी म्हटलंय. सर्वाधिक लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस’ च्या 14 व्या सीझनमध्ये राखी सावंतच्या एन्ट्रीमुळे हा कार्यक्रम बर्‍यापैकी रंजक झाला होता.

या शोमध्ये राखीने तिच्या चाहत्यांचे भरपूर मनोरंजन केले आणि शोच्या टॉप-5 फायनलिस्टमध्ये देखील तिने आपले स्थान निश्चित केलं होतं. ‘बिग बॉस 14’मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेल्या राखी सावंतने या घरात एक वेगळी ओळख निर्माण केली होती.

थोडक्यात बातम्या-

कुऱ्हाडीने वार करत अल्पवयीन मुलाने केली वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आलं समोर

रेमडेसिविरच्या बाटल्यांमध्ये पॅरासिटीमोल भरून विक्री; बारामतीतील धक्कादायक प्रकार

कोरोना खरंच हवेतून पसरतो का?; आयसीएमआरच्या माजी संचालकांचा महत्वाचा खुलासा

“मला कोरोनाचे जंतू मिळाले असते तर मी ते फडणवीसांच्या तोंडातच कोंबले असते”

कोरोनाकाळात अनेकांना जीवनदान देणाऱ्या डॉक्टर पिता पुत्रांचा कोरोनाने मृत्यू!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More