बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Omicron: पुणेकरांच्या चिंतेत वाढ, पुण्यातील कोरोनाबाधिताला Omicron नाही, पण…

पुणे | सध्या सर्वत्र कोरोनाच्या (Corona) नव्या व्हेरियंटनं (New Veriant) धुमाकुळ घातला आहे. दक्षिण आफ्रिकेत (South Africa) ओमिक्राॅनच्या (Omicron) रूग्ण संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. सर्वत्र काळजीचं वातवरण आहे. सध्या आपल्या देशात एकुण चार ओमिक्राॅनचे रूग्ण (Patient) आढळले आहेत. अशातच महाराष्ट्रात डोंबिवली येथे रूग्ण आढळल्यानं सर्वत्र खळबळ माजली होती. सध्या पुण्याची चर्चा अशात जोरात आहे.

पुणे (Pune) येथे सुद्धा ओमिक्राॅनचा (Omicron) रूग्ण असल्याच्या अफवा पसरल्या होत्या पण त्या फक्त अफवा आहेत. पुणे येथील  कोरोनाबाधिताची चाचणी करण्यात आली आहे. त्याच्यात ओमिक्राॅनचा कसलाही विषाणू आढळला नाही मात्र नवा व्हेरियंट आढळला आहे. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेमध्ये या 60 वर्षाय रूग्णाची तपासणी करण्यात आली आहे.

सध्या सर्वत्र कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा धुमाकुळ सुरू आहे. देशात येणाऱ्या विमान प्रवाशांची कसून तपासणी करण्यात येत आहे. सर्व प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. परिणामी सध्या कोरोनाच्या वेळी विमान प्रवासाबाबत ज्या चुका झाल्या त्या सरकार आणि प्रशासन सुधारण्याचा प्रयत्न करत आहे.

दरम्यान, पुणे (Pune) येथे आलेला रुग्ण हा दक्षिण आफ्रिकेतील झांबिया येथून आला होता. परिणामी त्याची कसून तपासणी करण्यात आली आहे. प्रशासनानं रूग्णांच्या सहवासातील सर्वांच्या चाचण्या करण्यास सुरूवात आली आहे.

थोडक्यात बातम्या 

दिलासादायक बातमी! Omicron बाबत आयसीएमआरच्या तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

“…तर राज्यात लाॅकडाऊन लावावं लागेल”

महाराष्ट्राचं टेंशन वाढलं; राज्यात आढळला Omicronचा पहिला रूग्ण

“…मग हा हट्ट कशासाठी?”, नाराजी व्यक्त करत देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण

तेजस्विनी पंडीत म्हणते ‘लिपस्टिक बॅन’, चाहत्यांना पडला प्रश्न

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More