बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…अन्यथा नारायण राणे यांचा जसा राजकीय अंत झाला, तसाच त्यांच्या मुलांचाही होईल”

पुणे | आमदार नितेश राणे (Nitesh Rane) हे विधानसभेबाहेर आदित्य ठाकरेंना Aaditya Thackrey) डिवचल्याप्रकरणी चांगलेचं अडचणीत आले आहेत. अधिवेशनातही यावरून नितेश राणेंना धारेवर धरण्यात आलं होतं. यातच संतोष परब प्रकरणी त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. आमदार दिपक केसरकर (MLA Dipak Kesarkar) यांनी नारायण राणेंना नितेश राणे आणि निलेश राणे यांच्यावरून सल्ला दिला आहे.

“माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या दोन्ही मुलांनी वेळेत सुधारावं. अन्यथा नारायण राणे यांचा जसा राजकीय अंत झाला. तसाचं त्यांच्या मुलांचाही होईल”, असा सल्ला दिपक केसरकर यांनी नारायण राणे यांना दिला आहे. शिवाय नारायण राणे स्वत:च्या मुलांच्या पोरकटपणावर नियंत्रण आणू शकले नाहीत, असंही ते यावेळी म्हणाले.

“नितेश राणे यांनी विधानसभेत केलेला पोरकटपणा उभ्या महाराष्ट्राने पाहिला आहे. या वर्तनाबद्दल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांना झापले आहे. नारायण राणे यांचा तोल गेला आहे. आपण किती शूर आहोत हे राणे दाखवत असले तरी ते पोलिसांना खूप घाबरतात,” असा टोलाही केसरकर यांनी राणेंना लगावला आहे.

दरम्यान, सिंधूदूर्ग जिल्हा बँक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कोकणातील राजकीय वातावरण तापलेलं आहे. शिवसेनेचे पदाधिकारी संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्यावरून नितेश राणे यांच्यावर आरोप आहेत. त्यामुळे त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. याशिवाय नितेश राणे यांनी उच्च न्यायालयाकडे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज देखील केला आहे.

थोडक्यात बातम्या-

‘पराभूतसम्राट सांगे लोकांना, शेंबुड त्याच्याच नाकाला’; रुपाली ठोंबरेंचा हल्लाबोल

Corona: शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण

“…तेव्हा कुठे गेला होता राजा सुता तुझा धर्म”; भास्कर जाधव कडाडले

पुढील दोन दिवस अवकाळी पावसाचा इशारा, ‘या’ भागात अलर्ट जारी

‘तिसरी लाट आलीच तर ती…’; Omicron बाबत दिलासादायक माहिती समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More