बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…..अन्यथा ठाकरे सरकार विरोधात रस्त्यावर उतरेल – डॉ. अजित नवले

अहमदनगर | एकीकडे विवादित केंद्रीय कृषी कायद्यांना विरोध करायचा आणि दुसरीकडे त्यात जुजबी बदल करून बहुतांश त्याच तरतुदींसह राज्यात लागू करायच्या. अशा पद्धतीनं केंद्राचेच वादग्रस्त कायदे राज्यात लागू करण्याचा महाविकास आघाडीच्या सरकारचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप किसान सभेतर्फे करण्यात आला आहे.

जे बदल करायचे त्यांचा मसुदा जाहीर करूनच निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशाराच किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.

केंद्रीय कृषी कायद्यांमधील तरतुदी महाराष्ट्रात लागू करण्याची घाई का करत आहे? राज्य सरकारने सुरू केलेली संशयास्पद घाईगर्दी तातडीने थांबवावी. नक्की कोणते बदल सरकार करू पाहते आहे याबद्दलचा मसुदा चर्चेसाठी पब्लिक डोमेनमध्ये प्रसिद्ध करावा, असं नवले यांनी म्हटलं.

दरम्यान, महाराष्ट्र सरकारने सगळ्या शेतकऱ्यांना, शेतकरी संघटनांना व किसान सभेला विश्वासात न घेता संशयास्पद घाई केली व तीन केंद्रीय कृषी कायद्यांमधील तरतुदी मागच्या दाराने महाराष्ट्रात लागू काढण्याचे संशयास्पद प्रयत्न केले तर त्याचा कठोर प्रतिकार किसान सभा करेल. असा इशाराही नवलेंनी दिला आहे.

थोडक्यात बातम्या – 

“भाजपमधील काहीजणांचं मानसिक संतुलन बिघडलं, त्यातील एक पडळकर”

‘हा’ जिल्हा झाला कोरोनामुक्त?; आज एकाही रुग्णाचा मृत्यू नाही, तर अवघ्या 25 नव्या बाधितांची नोंद 

निष्काळजीपणा! कामावर डॉक्टर न आल्यामुळे 12 कोरोना रूग्णांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू

अखेर त्याने करून दाखवलं! विदर्भाच्या तरुणाला मिळाली लंडनची स्कॉलरशिप

“अजित पवार आणि अनिल परबांचे मनसुख हिरेन आणि स्फोटक प्रकरणातील वाझेशी संबंध”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More