बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…नाही तर राज्य अंधारात जाईल’; अशोक चव्हाण यांचा गंभीर इशारा

नांदेड | उर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी कोणालाच वीज फुकट मिळणार नाही. वीजबिलं प्रत्येकाला भरावीच लागणारं, असं वक्तव्य केलं होतं. यावरून त्यांच्यावर टीका केली जात असतानाच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok chavhan) यांनी मात्र नितीन राऊत यांची पाठराखण केली आहे.

वीज मंडळ अडचणीत आहे. वीज मंडळाकडे पैसैच उपलब्ध झाले नाही तर राज्य अंधारात जाईल, असा इशारा अशोक चव्हाण यांनी दिला आहे. वीज मंडळाची परिस्थिती बिकट आहे. शेतकरी देखील अडचणीत आहेत. अशावेळी मध्यम मार्ग, सवलतीचा मार्ग काढला पाहिजे, असा समजूतीचा सल्लाही त्यांनी दिला आहे.

नितीन राऊतांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना चव्हाण यावेळी म्हणाले, लोकांना त्रास व्हावा असं आम्हाला पण वाटत नाही. पण वीज मंडळाकडे पैसे नसेल तर राज्य अंधारात जाईल. ती दक्षता देखील घ्यावी लागते. यातून समन्वयाने मार्ग काढावा.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी ‘वीज फुकटात तयार होत नाही. त्यासाठी कोळसा लागतो, पैसा लागतो, कर्ज काढावं लागतं, ते आणायचं कुठून?’ असं म्हणत नितीन राऊत यांनी शेतकऱ्यांना वीज बिल भरावचं लागेल, असं म्हटलं होत. शिवाय भाजपने शेतकऱ्यांना सवय लावून ठेवली आहे. त्यामुळे अडचण होत आहे, असंही वक्तव्य राऊत यांनी केलं होत.

थोडक्यात बातम्या-

‘लोकशाहीवर भाजपने धडे देण्याची गरज नाही’; अजित पवार कडाडले

धक्कादायक! स्वप्नील लोणकर पाठोपाठ आणखी एका MPSC करणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या

मोठी बातमी! काल रात्री अचानकपणे मुख्यमंत्र्यांची विधानभवनाला भेट, शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदाच बाहेर

‘या’ भागातील विद्यार्थ्याला कोरोनाची लागण, शाळा केली आठवड्याभरासाठी बंद

रोहित-विराटला मोठा झटका! सर्वोत्तम प्लेइंग इलेवनमध्ये स्थान नाही

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More