Top News पुणे महाराष्ट्र

अन्यथा वारकरी संप्रदाय येणाऱ्या सर्व निवडणूकांवर बहिष्कार टाकेल

पुणे | कोरोना संसर्ग रोगामुळे गेले 9 महिन्यापासून राज्यातील विठुरायाचं मंदिर बंद आहेत. येत्या कार्तिकी एकादशीला मंदीराची सर्व दारे उघडून कमीतकमी निर्बंध घालून यात्रा होऊ द्यावी,अशी मागणी वारकरी संप्रदाया़ने केली आहे.

याबाबत शासनाने आषाढी यंत्रणेप्रमाणेच निर्बंध घातल्यास वारकरी संप्रदाय येणाऱ्या सर्व निवडणूकांवर बहिष्कार टाकेल, असा इशारा वारकरी संप्रदायाच्या बैठकीत देण्यात आला आहे.

कार्तिकी एकादशीला सकाळी बारा वाजेपर्यंत वारकऱ्यांना सोशल डिस्टन्स पाळून प्रदक्षिणा करु द्यावी, अशी विनंती वारकरी संप्रदायाकडून पाठवण्यात येणाऱ्या प्रस्तावात केली जाणार आहे.

कोरोनाचे नियम पाळून वारकऱ्यांना यात्रेला येऊ द्यावे, प्रत्येक मठात 50 भावीकांना उतरण्याची परवानगी द्यावी, अशीही विनंती प्रस्तावात केली जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

पुढील आयपीएल भारतात की बाहेर?; गांगुलींनी दिलं उत्तर

मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे दिवाळीत फटाक्यांमुळे होणारं प्रदूषण कमी करू- लता मंगेशकर

ऑस्ट्रेलिया दौऱ्याअगोदरच टीम इंडियाची चिंता वाढली, ‘हा’ खेळाडू दुखापतग्रस्त

“नोटाबंदी चूक नव्हे, मित्रांच्या कर्जमाफीसाठी पंतप्रधानांनी उचललेलं पाऊल”

अलका कुबल यांची बाजू घेत उदयनराजेंचा प्राजक्ता गायकवाडला इशारा, म्हणाले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या