बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आपला देशच भारीये, आपलं नशीब आहे की आपण भारतात राहतो”

लखनऊ | अफगाणिस्तान, तालिबान, अशरफ घनी, मुल्ला बरादार या चार शब्दाभोवती सध्या अवघं जग फिरताना पहायला मिळत आहे. रक्तात भरलेले कपडे, अस्ताव्यस्त जीवन, हेच चित्र अफगाणिस्तानचं सध्या आहे. वैश्विक समुदाय सुद्धा अफगाणिस्तानपासून बराच लांब पळताना पहायला मिळत आहे. यावरून आता प्रत्येक नागरिक आपला देशच भारी हे सांगताना पहायला मिळत आहे.

उत्तर प्रदेश चित्रपट विकास परिषदेचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध विनोदकार राजू श्रीवास्तव यांनी अफगाणिस्तानमध्ये घडत असलेल्या गोष्टींवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. मी जेव्हा आफगणिस्तानमधील परिस्थिती पाहतो तेव्हा मला प्रचंड वेदना होतात, असंही ते म्हणाले आहेत.

अफगाणिस्तानमध्ये भाजप नाही, आरएसएस नाही, बजरंग दल नाही तरी अफगाणिस्तानमध्ये किती मोठी लढाई चालू आहे. अफगाणिस्तानची परिस्थिती ही काही धार्मिक नाही. त्या ठिकाणी मुस्लिमच मुस्लिमांना मारत आहेत हे का घडतंय? याच्याकडे सुद्धा आपण लक्ष देणं गरजेचं असल्याचं राजू श्रीवास्तव म्हणाले आहेत.

मुस्लिम सोबत मुस्लिम लढत होते. ते एकमेकांना घाबरत आहेत. जीव वाचवण्यासाठी ते लोक किती धडपड करत आहेत हे पाहणं केविलवाणं आहे. देव करो या गोष्टी आणि असली वाईट परिस्थिती कोणत्या देशावर येवू नये. आपलं नशीब आहे की आपण भारता सारख्या सुखरूप देशात रहात आहोत, असंही राजू श्रीवास्तव म्हणाले आहेत .

थोडक्यात बातम्या 

गोळीबार सुरू असतानाही महाराष्ट्राची लेक नमली नाही; भारतीयांना मायदेशी सुखरूप आणलं

एअरलिफ्ट यशस्वी! अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांची सुटका

धर्म जगणे आणि धर्म जपणे यातील अंतर जाणा- उद्धव ठाकरे

“लवकरच मोदी सरकार कोसळणार, राहुल गांधी होणार पुढील पंतप्रधान”

सारं जग झुकलं मात्र ‘हा’ पठ्ठ्या एकटा तालिबानपुढं उभा ठाकलाय, याचा गड अजूनही अभेद्य कसा?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More