बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबईकरांच्या चिंतेत वाढ! कोरोनानंतर ‘या’ दोन साथीचं थैमान

मुंबई | नुकतीच कोरोनाची भीती लोकांच्या मनातून जात आहे. अशातच डेल्टा सारख्या इतर आजारांनी पुन्हा लोकांची चिंता वाढवली. त्यामुळे आता मुंबईमधील लोकांना अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. अशातच मुंबईमध्ये पुन्हा दोन आजारांची साथ पसरताना दिसत आहे.

कोरोनानंतर मुंबईमध्ये आता डेंग्यू आणि मलेरियाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. डेंग्यू आणि मलेरियाचे अनेक रुग्ण मुंबईमध्ये आढळून आले आहेत. ऑगस्ट महिन्यात डेंग्यू आणि मलेरियामुळे ताप आलेल्या अशा रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचं दिसून आलं.

ऑगस्ट महिन्यात मलेरियाचे 790 रुग्ण अढळून आले आहेत. तर डेंग्यूचे 132 रुग्ण आढळून आले होते. आतापर्यंत एकूण मुंबईत 209 डेंग्यू रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. जानेवारी ते ऑगस्टपर्यंत मलेरियाचे एकूण 338 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, कोरोनाची साथ कमी होतच होती की, तेवढ्यात डेंग्यू आणि मलेरियाने डोकं वर काढलं आहे. अशातच हवामान आणि वातावरण या आजारांना पोषक ठरत आहेत. त्यामुळे मुंबईकरांनी वेळीच खबरदारी बाळगून योग्य ती काळजी आणि तपासणी करावी, असा वैद्यकीय सल्ला प्रशासनाने दिला आहे.

थोडक्यात बातम्या-

तारीख ठरली! ‘या’ तारखेला होणार हिवाळी अधिवेशन

सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूचा चाहतीला बसला मोठा धक्का! कोमात गेली तरुणी अन्…

पंजशीर जिंकल्याचा आनंद लहान मुलांच्या जिवावर बेतला; हवेत केला गोळीबार अन्…

RSSला पाठिंबा देणारे लोक तालिबानी मानसिकतेचे – जावेद अख्तर

मोदींचं मिशन काश्मीर! एक दोन नव्हे तर तब्बल 70 मंत्री करणार जम्मू काश्मीरचा दौरा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More