Top News परभणी महाराष्ट्र

कौतुकास्पद! अंधत्वावर मात करत लताने केलं कळसूबाई शिखर सर

परभणी | महाराष्ट्रातील सर्वात उंच आणि चढण्यासाठी कठीण मानलं जाणार कळसूबाई शिखर सर करत लता पांचाळ या दिव्यांग मुलीने एक आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे. पूर्णा तालुक्यातील देऊळगाव दुधाटे येथील उध्दवराव आणि अरुणाबाई यांची मुलगी लता ही युवती नेत्रहीन आहे.

दरवर्षी शिवार्जुन प्रतिष्ठानकडून दरवर्षी दिव्यांग युवक-युवतींना कळसूबाई शिखर करण्याची मोहिम आखून प्रोत्साहित केलं जातं. यामध्ये लतानेही भाग घेतला होता.

लताने तिच्या काही मैंत्रिणींच्या मार्गदर्शनाखाली श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय, कळसूबाई माता की जय, हर हर महादेव अशा घोषणा देत चढाईला सुरूवात केली. शेवटी येणाऱ्या चार लोखंडी शिड्या लताने मोठ्या जिद्दीने पार केल्या आणि नववर्षाच्या पूर्वसंध्येला लताने हे शिखर सर केलं.

दरम्यान, नववर्षाच्या पहाटे सह्याद्री पर्वताच्या माथ्यावर असलेल्या कळसूबाई मंदिरात त्यांनी दर्शन घेतले. तसेच उगवत्या सूर्याला नमस्कार करुन सकाळी 10 वाजता परतीची वाट धरत खाली उतरण्यास सुरुवात केली.

थोडक्यात बातम्या-

“आमच्या हातात गुजरात द्या आम्ही “अहमदाबाद”चं नाव बदलुन दाखवतो, वाटल्यास तुमचं नाव देतो”

कोविड योद्ध्यांना लसीकरणासाठी नोंदणीची गरज नाही- आरोग्य मंत्रालय

मेहबूब शेख प्रकरणात मला पोलिसांची बाजू संशयास्पद वाटते- चित्रा वाघ

शिवसेना ही नाटक कंपनी आहे- देवेंद्र फडणवी

‘तीन काय 30 पक्षही एकत्र आले तरी भाजपच जिंकेल ; भाजप खासदाराला विश्वास

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या