देश

पैसे काँग्रेसकडून घ्या, पण मत मला द्या- असदुद्दीन ओवैसी

हैदराबाद | काँग्रेसकडे खूप पैसा आहे, तो घ्या आणि मला मतदान करा, असं जाहीर आवाहन ‘एमआयएम’चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केलं आहे. ते तेलंगणामध्ये एका सभेत बोलत होते.

काँग्रेसमधील लोकांकडे खूप पैसा आहे, त्यांच्याकडून घ्या. तुम्हाला माझ्यामुळे पैसा मिळेल. फक्त मला मतदान करा. जर ते तुम्हाला देत असतील तर ते घ्या. मी काँग्रेसला दर वाढवण्यास सांगतो. माझी किंमत केवळ दोन हजार रुपये नाही. माझी योग्यता त्यापेक्षा जास्त आहे, असं ओवैसी यांनी म्हटलं आहे.

तेलंगणमधील भैंसामध्ये दोन समुदायांमध्ये घडलेल्या हिंसाचाराच्या घटनेवरही ओवैसींनी भाष्य केलं. मी मुख्यमंत्र्यांकडे सर्व दोषींविरोधात कारवाई करण्याची मागणी करतो. तसंच पीडितांना नुकसानभरपाई दिली जावी, अशीही मागणी ओवैसींनी यावेळी केली आहे.

दरम्यान, काहीच दिवसांपूर्वी काँग्रेसच्या कॅबिनेट मंत्री यशोमती ठाकूर यांनीही अशाचप्रकारचं वक्तव्य केलं होतं.

महत्वाच्या बातम्या- 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या