देश

आता भारतीय अर्थव्यवस्थेला देवच वाचवू शकतो- पी. चिदंबरम

नवी दिल्ली | जीडीपीच्या आकड्यांना काही अर्थ राहिलेला नाही. वैयक्तिक करात कपात होईल, आयात शूल्कात वाढ केली जाईल. सुधारणेबाबत भाजपचे हे विचार आहेत. भारताच्या अर्थव्यवस्थेला देवच वाचवेल, असं म्हणत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी भाजप सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी जीडीपीवर केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर पी चिदंबरम यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं. आता देशाच्या अर्थव्यवस्थेला देवच वाचवू शकतो, असा टोला चिदंबरम यांनी भाजपला लगावला आहे.

जीडीपी आणि अर्थव्यवस्थेविषयी बोलताना  निशिकांत दुबे यांनी जीडीपीचा फार उपयोग होणार नसल्याचं म्हटलं होतं. त्यावरून काँग्रेसने भाजपवर सडकून टीका केली आहे.

दरम्यान, देवा आम्हाला नव्या भारतातील अशा नवशिक्या अर्थशास्त्रज्ञांपासून आम्हाला वाचव, असा टोला काँग्रेस नेते रणदीप सुरजेवालांनी दुबेंना लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या- 

 

 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या