बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“गोव्यात जिंकणारा पक्ष लोकसभेतही विजयी होतो, आम्ही दोन्ही ठिकाणी बाजी मारू”

पणजी | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीयमंत्री पी. चिदंबरम गोवा दौऱ्यावर आहेत. पी. चिदंबरम यांनी पणजीत गोव्यातील निवडणूक अभियान कार्यालयाचा शुभारंभ केला. यावेळी बोलताना, गोव्यात जो पक्ष जिंकतो, तो लोकसभा निवडणुकीतही विजयी होतो. मात्र, काँग्रेस दोन्ही ठिकाणी नक्कीच बाजी मारेल, असा दावा चिदंबरम यांनी केला आहे.

इतिहास साक्षीदार आहे. गोवा जो जिंकतो, तो दिल्लीही जिंकतो. सन 2007, 2009 वेळच्या निवडणुकांमध्ये गोव्यात काँग्रेसचा विजय झाला होता आणि केंद्रीय निवडणुकांमध्येही या कालावधीत झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने बाजी मारली होती. दुर्दैवाने सन 2012 मध्ये गोवा काँग्रेसच्या हातून निसटले आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकांमध्येही काँग्रेसला पराभवाला सामोरं जावं लागलं, असं चिदंबरम म्हणालेत.

मागील गोवा विधानसभा निवडणुकांमध्ये गोव्यात काँग्रेसला चांगलं यश मिळालं होतं. मात्र, तरीही सत्ता स्थापन करण्यात आपण असमर्थ ठरलो. आता मात्र इतिहासाची पुनरावृत्ती होऊ द्यायची नाही, असंही चिदंबरम म्हणाले.

आत्मविश्वासाने कार्य करत पुन्हा एकदा गोवा जिंकण्यासाठी कंबर कसण्याची गरज आहे. काँग्रेस पक्ष गोव्यातील आगामी निवडणुका आणि त्यानंतर होणाऱ्या लोकसभा निवडणुकाही जिंकेल, असा दावा पी. चिदंबरम यांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘गर्व से कहो हम हिंदू है’; शिवसेना भवनासमोर पोस्टरबाजी करत मनसेनं सेनेला डिवचलं

पालिका निवडणुकांच्या तोंडावर शरद पवार पिंपरी चिंचवड दौऱ्यावर!

शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये भररस्त्यात तुफान हाणामारी

“उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून भाजपची अवस्था वाघाला पाहून भेदरलेल्या मेंढरांसारखी झाली”

रूपालीताई कशा आहेत हे चित्राताई वाघ यांना माहिती असेल त्यामुळे…- चंद्रकांत पाटील

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More