जालना | कोरोना लसीकरणासाठी लागणार खर्च हा केंद्र सरकारने करायला हवा अशी मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. शिवाय एका राज्यात एकाच कंपनीच्या लसीकरणाला मान्यता द्यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.
लसीकरणासाठीच्या कोल्ड चैन आणि लागणाऱ्या मनुष्यबळाचा खर्च केंद्र सरकारने द्यावा अशी अपेक्षा राजेश टोपे यांनी व्यक्त केली. दरम्यान पहिल्या टप्प्यातील लसीकरणाचा पहिला डोस अंदाजे अडीच महिन्यात पूर्ण होऊ शकेल असा अंदाज राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे.
कोरोनाच्या दोन लसींना देशात मान्यता मिळाली आहे. काही दिवसाता लसीकरण मोहिम देखील सुरु होईल. मात्र कोरोनाची लस मोफत मिळणार की पैसे लागणार हा प्रश्न अनुत्तरित आहे.
दरम्यान, केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार महाराष्ट्रातील 30 जिल्हे आणि 25 महानगरपालिका क्षेत्रांमध्ये कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन मोहिम राबवण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यांमध्ये 3 आरोग्य संस्था आणि प्रत्येक महानगरपालिकेमध्ये 1 आरोग्य संस्था याठिकाणी हा ड्राय रन घेण्यात येईल, असंही राजेश टोपे यांनी नमूद केलंय.
थोडक्यात बातम्या-
“राष्ट्रवादी काँग्रेसनं बनवाबनवी केली, ते पंचायत समिती सदस्य भाजपमध्येच”
MPSC च्या परीक्षा जाहीर, ‘या’ तारखेला होणार परिक्षा
सुशांत सिंग राजपूतच्या कामाची उच्च न्यायालयाने केली प्रशंसा
हरिद्वारमध्ये मोठा रेल्वे अपघात, ट्रायल दरम्यान रेल्वेखाली चिरडून चोघांचा मृत्यू
येत्या 24 तासांत ‘या’ भागात पावसाचा अंदाज!