बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

हिमाचल प्रदेशातील नॅशनल हायवेवर दरड कोसळली; धडकी भरवणारा व्हिडीओ व्हायरल

शिमला | कोरोना महामारीनं सगळीकडे थैमान घातलं असतानाच गेल्या काही दिवसांमध्ये अतिवृष्टीमुळे आणखी हाहाकार माजवला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती पाहायला मिळाली याचबरोबर बऱ्याच ठिकाणी दरडही कोसळलेली पाहायला मिळाली. नुकतंच हिमाचल प्रदेशच्या सांगला व्हॅलीत दरड कोसळली होती. ती घटना ताजी असतानाच आणखी अशीच एक भीषण घटना समोर येत आहे.

ही घटना हिमाचल प्रदेशातीलच आहे. हिमाचल प्रदेशातील किन्नोरमधील नॅशनल हायवेवर दरड कोसळली असून याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. या दुर्घटनेत जवळपास 40 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याचा अंदाज लावला जात आहे.

किन्नौर जिल्ह्यातील चौरा येथील नॅशनल हायवेवर दरड कोसळण्याची ही भीषण घटना घडली असून ही घटना काल दुपारी दोनच्या सुमारास घडली. या दुर्घटनेनंतर तेथील परिसरात खळबळ उडाली असून परिसरातील रस्ता उद्ध्वस्त झाला आहे. तसंच एक बस आणि दोन कार या दरडीखालील ढिगाऱ्यात अडकले आहेत. अजूनही तिकडे डोंगरावरुन दगड खाली पडत असल्यानं भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

दरम्यान, या भीषण घटनेनंतर तेथील नागरिकांनी ही घटना पोलिसांना कळवत सर्व घटना त्यांना कळवली. त्यांनंतर काही वेळातच एनडीआरएफचे पथक आणि भारतीय सैन्याचे जवान घटनास्थळी दाखल झाले. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर सारखा पाहिला जात आहे.

थोडक्यात बातम्या –

अनाथ मुलांसाठी राज्य सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आजची आकडेवारी

पुणे कोरोनामुक्तीच्या वाटेवर, वाचा पुण्याची आजची आकडेवारी

भाजपच्या पोटात मराठा आरक्षणाविषयी आकस- सुप्रिया सुळेेेंचा भाजपवर निशाणा

दिलासादायक! येत्या चार ते पाच दिवसात होणार पावसाचं दमदार आगमन, हवामान खात्याचा अंदाज

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More