होय, हाफिज सईद जिहादच्या नावावर दहशतवाद पसरवतोय- पाकिस्तान

हाफिज सईद

नवी दिल्ली | मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईद दहशतवाद पसरवण्याचं काम करत असल्याचं पाकिस्ताननं मान्य केलंय. टाईम्स ऑफ इंडियानं यासंदर्भात वृत्त दिलंय. 

हाफिज सईदसह त्याच्या ४ साथीदारांना नजरकैदेत टाकण्यासाठी न्यायालयापुढे सुनावणी झाली. यावेळी काश्मीर मुद्द्यावर आवाज उठवल्याने आपल्याला ताब्यात घेतल्याचा दावा हाफिज सईदने केला होता. मात्र पाकिस्तानी गृहमंत्रालयाने हा दावा फेटाळून लावत जिहादच्या नावावर दहशतवाद पसरवण्याचा सईदवर आरोप असल्याचं म्हटलंय. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या