बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारताविरूद्ध पाकिस्तानची रणनीती! ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ दिग्गज खेळाडूकडे सोपवली मोठी जबाबदारी

नवी दिल्ली | आगामी आंतरराष्ट्रीय टी-20 विश्वचषकासाठी अनेक देशांनी आपल्या संघाची घोषणा केली आहे. भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी संघाचा सामना आगामी आयसीसीच्या टी-20 विश्वचषकात रंगणार आहे. त्यामुळे या सामन्याची प्रतिक्षा चाहत्यांना लागून आहे. अशातच भारताला टक्कर देण्यासाठी पाकिस्तानने वेगळी रणनीती आखल्याचं पहायला मिळतंय. पाकिस्तान संघाने आगामी विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूची मुख्य प्रशिक्षपदासाठी निवड केली आहे.

17 ऑक्टोबरपासून आंतरराष्ट्रीय टी-20 विश्वचषक स्पर्धेला सुरूवात होत आहे. त्यामुळे भारतासह इतर देश यासाठी जोरदार तयारीला लागले आहेत. भारताने देखील आपला संघ जाहीर केला. या स्पर्धेत भारताचा पहिला सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरोधात आहे. त्यामुळे ऑस्टेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडन याच्याकडे पाकिस्तान क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे रमीझ रझा हे अध्यक्ष झाल्यापासून संघात अनेक गोष्टी घडल्याच्या बातम्या समोर आल्या.  संघाचे मुख्य प्रशिक्षक मिसबाह-उल-हक आणि गोलंदाजी प्रशिक्षक वकार युनूस यांना आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर यांची जागा कोण घेणार? याबाबत सगळ्यांचे लक्ष लागून होते. त्यानंतर पाकिस्तानने हेडनकडे मुख्य प्रशिक्षक तर व्हर्नान फिलॅंड यांच्याकडे गोलंदाजी प्रशिक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

दरम्यान, भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ विश्वचषकासाठी एकाच गटात आहेत. त्याचबरोबर या गटात न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान हे संघही असणार आहेत. त्यामुळे या गटांमधून कोणता संघ बाजी मारून अंतिम फेरीत धडक मारणार, याची चर्चा आता क्रिकेटविश्वात रंगली आहे.

थोडक्यात बातम्या- 

“दुसऱ्यांच्या मुलांकडे बोट दाखवण्याआधी आपला मुलगा काय करतो ते पहावं”

“स्वत:ला अग्रस्थानी ठेवून नवा इतिहास लिहिण्याचा भाजपचा प्रयत्न”

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते ऑस्कर फर्नांडिस यांचं निधन

पाच जिल्हा परिषद निवडणुकीचं बिगुल वाजलं! ‘या’ तारखेला होणार मतदान

भारताविरूद्ध पाकिस्तानचा ना’पाक डाव! ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ दिग्गज खेळाडूकडे सोपवली ही मोठी जबाबदारी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More