‘चहापावडर सरकार उधारीवर घेतंय’ सांगत मंत्र्याने नागरिकांना केलं चहा कमी पिण्याचं आवाहन
इस्लामाबाद | पाकिस्तानचे केंद्रीय मंत्री एहसान इक्बाल यांनी नागरिकांना चहा कमी पिण्याचं आवाहन केलं आहे. यामागचे कारणही तितकंच विचित्र आहे. चहा आयातीवर लागणारा भार कमी करण्यासाठीचा एक पर्याय म्हणून असं आवाहन करण्यात आलं आहे. चहा तयार करण्यासाठी लागणारी चहापावडर पाकिस्तानला आयात करावी लागते, जी सध्या पाकिस्तान सरकार उधारीवर घेत आहे.
इंधन आयातीसाठीच शुल्क कमी व्हावं यासाठी रात्री साडेआठ नंतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले गेले आहेत. रात्री 10 नंतर लग्नसमारंभावर बंदी घालण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर विजेची बचत करण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 5 दिवसांचा आठवडा करण्यात आलाय तर शक्य असल्यास घरुनच काम करण्याचा सल्लाही देण्यात आलाय.
दरम्यान, यावर भाष्य करताना पाकीस्तानचे केंद्रीय मंत्री एहसान इक्बाल म्हणाले “जर यांसारखे कठोर निर्णय घेतले नाहीत तर पाकिस्तानचे हाल श्रीलंकेसारखे व्हायला वेळ लागणार नाही. मात्र त्यांच्या या नियमांची चर्चा सगळीकडे होत असून पाकिस्तानची खिल्ली उडवली जात आहे.
दरम्यान, पाकिस्तानातील इम्रान खान सरकार जाऊन नवं सरकार स्थापन झालं आहे. तरीही पाकिस्तानची परिस्थिती जैसे थे आहे किंबहुना अधिक बिकट झाली आहे. अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. ती सुरळीत करण्यासाठी पाकिस्तान लोकांना आवाहन करत आहे.
थोडक्यात बातम्या
“राष्ट्रपती पदासाठी उंची लागते, शरद पवारांकडे कोणती उंची आहे त्यांनी सांगावं”
‘…तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करु नये’; कृषीमंत्री दादा भुसे यांचं आवाहन
राज्यातील कोरोना रुग्ण संख्येत पुन्हा वाढ, वाचा आकडेवारी
काय सांगता! आता व्हॉट्सअॅपवरून कर्जही काढता येणार, वाचा सविस्तर
“पंकजा मुंडेंना उमेदवारी नाकारल्याने पक्षात सर्वकाही अलबेल आहे असं भाजपने समजू नये”
Comments are closed.