बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आम्ही वाट पाहतोय सभ्य शेजारी बनून राहण्याची पण आरएसएची विचारसरणी मध्ये आली”

नवी दिल्ली | भारत पाकिस्तानचे संबंध अनेक वर्षांपासून तणावाचे आहेत. सीमेपलिकडून होणाऱ्या कारवाया आणि शस्त्रसंधीचं उल्लंघन यामुळे दोन्ही देशांमधील संबंध खराब राहिले आहेत. मात्र या सगळ्याला आरएसएसची विचारसरणी मध्ये येत असल्याची टीका पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी केली आहे.

चर्चा आणि दहशतवाद सोबत चालू शकतात का?, असा सवाल एनआयएच्या प्रतिनिधींनी विचारला. हा प्रश्न भारताकडून विचारलं जात असल्याचं प्रतिनिधी म्हणाले. यावर बोलताना इमरान खान यांनी थेट आरएसएसवर सगळ्याचं खापर फोडलं आहे. दक्षिण-मध्य आशिया परिषदेसाठी इम्रान खान सध्या उझबेकिस्तानमधील ताश्कंद येथे दाखल झाले.

भारताला आम्ही सांगू शकतो की गेल्या कित्येक दिवसांपासून आम्ही वाट पाहतोय सभ्य शेजारी बनून राहण्याची पण काय करणार आरएसएसची विचारसरणी मध्ये आली, असं इमरान खान म्हणाले.

दरम्यान, इमरान खान यांच्या वक्तव्याचे पडसाद आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आता यावर भाजप आणि आरएसएसकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

मोदी सरकारनं दिली आत्तापर्यंतची सर्वात मोठी ऑर्डर; खरेदी करणार ‘इतके’ कोटी डोस

‘हो, पंकजा मुंडे देवेंद्र फडणवीसांवर नाराज आहेत’; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट

टी-सिरीजचे मॅनेजिंग डायरेक्टर भूषण कुमारवर बलात्काराचा आरोप; तीन वर्ष अत्याचार केल्याचा दावा

“संजय राठोड आमचे दुश्मन नाहीत, शिवसेना तर अजिबात नाही”

ईडीची अनिल देशमुखांवर मोठी कारवाई, तब्बल इतक्या कोटींची संपत्ती जप्त

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More