बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बहुचर्चित ‘पळशीची पीटी’ची प्रतिक्षा संपली, पाहा ट्रेलर…

मुंबई |  कांस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ज्या चित्रपटाने संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीचे नाव गौरवित केले अशा बहुचर्चित “पळशीची पीटी…गोष्ट हरवलेल्या प्रत्येकाची” या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

साताऱ्यातील पळशी गावातून जन्मलेल्या या कथेमध्ये भागी आणि विकास या दोन मुख्य पात्रांची कहाणी सांगण्यात आली आहे. भागीची स्वप्ने पूर्ण करण्याचा तिचा संघर्ष, यामध्ये तिला कोण मदत करतं किंवा कोण मागं खेचतं, हे अगदी सहजपणे दाखवण्यात आलेलं आहे. दिग्दर्शक आणि निर्माते धोंडिबा कारंडे यांचा हा पहिलाच सिनेमा आहे.

‘पळशीची पीटी’ या सिनेमाला महाराष्ट्र शासनाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान देऊन गौरविण्यात आले तसेच संस्कृती कलादर्पण, गोवा मराठी चित्रपट महोत्सव, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, तसेच आंतरराष्ट्रीय कान्स चित्रपट महोत्सवातदेखील आपली चित्रपटरूपी कला सादर करण्याची संधी मिळाली.

‘पळशीची पीटी’ मध्ये किरण ढाणे, राहुल मगदूम, धोंडिबा कारंडे, विद्या सावळे, शिवानी घाटगे, दिक्षा सोनवणे, निलीमा कमाणे या कलाकारांनी काम केलंय.

दरम्यान, तेजपाल वाघ यांनी देखील चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली असून ‘लागीर झालं जी’मध्ये’ जितू काकाची भूमिका साकारणारे संदीप जंगम यांनी चित्रपटाची महत्वाची बाजू म्हणजे छायाचित्रण तसेच संपादन केले आहे. 23 ऑगस्ट रोजी पळशीची पीटी सिनेमा रिलीज होणार आहे.

‘पळशीची पीटी’ सिनेमाचा ट्रेलर: 

महत्वाच्या बातम्या-

-“पुलवामासारख्या घटनांचा जाब विचारला तर गद्दार ठरवलं जातं”

-कलम 370 हटवणं लोकशाहीविरोधी निर्णय- प्रियांका गांधी

-‘हिंदू पाकिस्तान’ शब्दामुळे शशी थरूर अडचणीत; कोर्टाचं अटक वॉरंट

-सांगलीत भाजप नगरसेविकेची गुंडगिरी; पूरग्रस्तांना मदत करणाऱ्या मराठा सेवा संघाच्या कार्यकर्त्यांना मारहाण

-पुण्यातील शिक्रापूरमध्ये महिलेचा विनयभंग, पीडितेचा आत्महत्येचा प्रयत्न

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More