लातूर | मराठा आंदोलनाचे पडसाद आता भाजप पदाधिकाऱ्यांमध्येही उमटत आहेत. मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भाजपचे पंचायत समिती सदस्य जनार्दन कास्ते यांनी राजीनामा दिला आहे.
कास्ते लातूरच्या औसा पंचायत समितीच्या लोदगा गणाचे सदस्य आहे. राज्य सरकार मराठा आरक्षण देईल की नाही? ते मला माहित नाही. मात्र, माझ्या राजीनाम्यामुळे मराठा आंदोलनाला एक संदेश मिळेल याचा मला अभिमान आहे, असं ते म्हणाले.
दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आपल्याच लोकप्रतिनीधींकडून राजीनामा देऊन सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न चालू आहेत.
महत्त्वाच्या बातम्या–
-मराठा आरक्षणासाठी आता काँग्रेस आमदाराचा राजीनामा!
-शिवसेना आमदार हेमंत पाटील यांनी अद्याप राजीनामा दिलेला नाही
-मनसे आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा!
-मराठा आरक्षणासाठी दिल्लीत खासदार एकवटले!
-मराठा आरक्षणासाठी आणखी एका शिवसेना आमदाराचा राजीनामा!