बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पंढरपूरच्या रुक्मिणीमातेच्या 5 हजार साड्या पूरग्रस्त महिलांना…!

सोलापूर | सांगली आणि कोल्हापूरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदीर समितीने रुक्मिणीमातेच्या 5 हजार साड्या पूरग्रस्त महिलांना देण्याचा निर्णय घेतला आहे. समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी ही माहिती दिली आहे.

ब्रह्मनाळ या गावातील बोट दुर्घटनेत झालेल्या मृतांच्या परिवारालाही या मंदिर समितीने मदत जाहीर केली आहे. दुर्घटनेमध्ये मृत झालेल्या व्यक्तींच्या परिवाराला 2 लाख रुपये मदत देणार असल्याचं सांगितलं आहे.

महापूरामुळे उद्ध्वस्त झालेली 5 गावे दत्तक घेऊन त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रत्येकी 5 लाख रुपयांची म्हणजेच 25 लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे, असं समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांनी कराडमध्ये पत्रकार परिषद घेऊन सांगितलं आहे.

दरम्यान, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शिर्डी येथील साईबाबा संस्थान यांनीही 10 कोटी रुपयांचा निधी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-आमदार संगीता ठोंबरे पूरग्रस्तांसाठी देणार एका महिन्याचं वेतन!

-‘त्या’ तिघांसाठी सदाभाऊ खोत देवासारखे धावून आले…!

-हरियाणाच्या मुख्यमंत्र्याचं काश्मीरवरून वादग्रस्त वक्तव्य; म्हणतात…

-अजून मी म्हातारा झालेलो नाही- शरद पवार

-शिरूरकरांनी दिलेली मदत घेऊन खासदार अमोल कोल्हे पूरग्रस्तांच्या भेटीला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More