पंढरपूर | मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत विठ्ठलाची शासकीय महापूजा पार पडली. विठ्ठलाची पूजा करण्याचा मान अनिल आणि वर्षा जाधव या हिंगोलीच्या दाम्पत्याला मिळाला.
पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास विठ्ठलाची शासकीय पूजा करण्यात आली. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, दुग्ध विकासमंत्री महादेव जानकर, परिवहन मंत्री दिवाकर रावते, खासदार अनिल देसाई उपस्थित होते.
दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाने इशारा दिला होता, त्यामुळे विठ्ठलाच्या शासकीय पूजेला न जाण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला होता.
महत्त्वाच्या बातम्या–
-विठ्ठलानं मुख्यमंत्र्यांना खरं बोलण्याची सद्बुद्धी द्यावी!
-मोदी सरकारची उलटगणती सुरू झालीय; सोनिया गांधींचा हल्लाबोल
-आई-बहिणीवरून शिव्या द्यायच्या नाहीत; धोनीचा खेळाडूंना दम
-मुख्यमंत्र्यांच्या नकारामुळे ‘यांना’ मिळणार विठ्ठलाच्या पुजेचा मान!
-इम्रान खान यांच्या खाजगी आयुष्यावर पत्नीचा गौप्यस्फोट