मुंबई | झी स्टुडिओज आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर ‘पांघरुन’ या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला एकत्र पाहायला मिळणार आहे. नटसम्राट आणि काकस्पर्श या चित्रपटांच्या बक्कळ यशानंतर आता ‘पांघरुन’ चित्रपट 20 मार्च ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
झी स्टुडिओज आणि महेश मांजरेकर यांचं एकत्रीकरण प्रेक्षकांसाठी काही नवीन नाही. चित्रपटाचा टीझर नुकताच झी स्टुडिओजच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर शेअर करण्यात आला आहे. या टीझरमधून समजतंय की ‘पुन्हा एकदा विलक्षण प्रेमकहाणी’ प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना चित्रपटाची उत्सुकता लागली आहे यात काही शंका नाही.
‘पांघरुन’ या चित्रपटाच्या माध्यमातून एक आगळीवेगळी प्रेमकहाणी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तसेच यातून काहीसा जुना काळ मांडण्याचा प्रयत्न केला आहे. टीजरमुळे या चित्रपटाची उत्सुकता अजून वाढत आहे.
गौरी इंगवले ही ‘पांघरुन’ या चित्रपटातून पदार्पण करताना दिसणार आहे. 20 मार्चला चित्रपट प्रेक्षकाच्या भेटीस येणार असून तो प्रेक्षकांना किती आवडतोय हे पाहणं महत्वाचं ठरेल.
https://www.youtube.com/watch?time_continue=35&v=-SJPToMk03k&feature=emb_title
ट्रेंडिंग बातम्या –
निकाल लागताच दिल्लीकरांना केंद्र सरकारचा दणका; गॅस सिलेंडर 144 रुपयांनी महागला
“देशभक्ती म्हणजे उत्तम शिक्षण, हॉस्पिटल सुविधा, वीज आणि पाणी पुरवणं होय”
महत्वाच्या बातम्या –
“अरे बंगल्यांवर उधळपट्टी कशाला करताय, बंगले पूर्ण होण्याआधीच तुम्ही जाणार आहात”
…म्हणून रितेश-जेनेलिया घेणार महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांची पत्नीसह भेट!
शाहरूख खानसोबत तुलना म्हणजे सन्मानाची गोष्ट- कार्तिक आर्यन
Comments are closed.