मनोरंजन

अब्दालीला झुंजवणाऱ्या मराठ्यांची शौर्यगाथा; पाहा ‘पानिपत’ सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर

मुंबई | अहमदशहा अब्दालीला पानिपतात झुंजवणाऱ्या मराठ्यांची शौर्याची गाथा म्हणजे पानिपतचं युद्ध… याच युद्धावर दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी सिनेमा काढला आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.

पानिपतच्या युद्धात सदाशिवराव पेशवे यांनी अद्भुत शौर्य गाजवलं होतं. त्यांनाच केंद्रस्थानी ठेवून हा सिनेमा तयार केल्याचं ट्रेलरमध्ये पहायला मिळतंय.  अभिनेता अर्जुन कपूर या सिनेमात सदाशिवराव भाऊ यांची भूमिका साकारत आहे. सदाशिराव यांची पत्नी पार्वतीबाई यांच्या भूमिकेत अभिनेत्री क्रिती सेनन दिसणार आहे.

मराठे पानिपतावर ज्या अब्दालीला भिडले त्या अब्दालीचं अत्यंत क्रूर रुप या सिनेमात पहायला मिळणार आहे. कसदार अभिनयासाठी प्रसिद्ध असलेला अभिनेता संजय दत्त अब्दालीच्या भूमिकेत आहे.

मराठ्यांची वीरश्री असलेल्या पानिपतवर आशुतोष गोवारीकर यांनी अत्यंत भव्यदिव्य सिनेमा बनवलेला आहे. पाहा या सिनेमाचा ट्रेलर-

पानीपत चित्रपटाचे काही पोस्टर्स-

 

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या