बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पंजशीरचे वाघ तालिबानवर पडले भारी; 300 तालिबान्यांना केलं ठार

काबुल | तालिबानी दहशतवादी हे अफगाणिस्तानच्या रस्त्यांवर सामान्य नागरिकांसारखे वावरत आहेत. आता अवघं जग आपल्या ताब्यात आल्यासारखं हे तालिबानी वागत आहेत. अमेरिकेने 70 लाखांच बक्षीस ठेवलेला दहशतवादी तर बाजारात खुलेआम फिरत आहे. काबुलसह खूप मोठा भाग आपल्या ताब्यात आल्याने हे दहशतवादी कसंही वागत आहेत. हे असताना सुद्धा काहीजण तालिबान्यांचा सामना करताना दिसत आहेत.

पंजशीर हा प्रांत ताब्यात घेण्यासाठी तालिबानी दहशतवादी हे प्रचंड प्रयत्न करताना दिसत आहेत. अहमद मसुद व अमरूल्ला सालेह या दोघांच्या रणनितीपुढे तालिबान आपले दहशतवादी गमावताना दिसत आहे. पंजशीरच्या याच सैनीकांनी आता 300 तालिबानी दहशतवाद्यांना मारलं आहे.

पंजशीर या प्रदेशावर ताबा मिळवण्यासठी गेलेल्या 300 दहशतवाद्यांना विद्रोही गटाने मारलं आहे. तालिबानसाठी हा खूप मोठा धक्का मानला जात आहे. नैसर्गिक विविधतेने नटलेला पंजशीर हा प्रांत काबिज करणं आजपर्यंत कोणालाचं जमलं नाही. तालिबानी दहशतवादी हे पंजशीरमध्ये पोहोचण्याच्या अगोदरच अद्राब खोऱ्यात त्यांच्यावर अहमद मसुद यांच्या नेतृत्वाखालील सैनिकांनी हल्ला केला व दहशतवाद्यांना संपवलं आहे.

पंजशीर हा प्रांत 1990 च्या गृहयुद्धात पण तालिबानला जिंकता आला नव्हता. या क्षेत्राचं नेतृत्व हे खूप वर्षांपासुन मसुद यांच्याकडे आहे. अहमद मसुद हे सध्या या भागातील सर्व विद्रोही लोकांचं नेतृत्व करत आहेत. अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती अमरूल्ला सालेह हे सुद्धा या भागातच उपस्थित असुन ते या भागातुनच तालिबान विरूद्ध लढायची मोर्चे बांधणी करत आहेत. मारल्या गेलेल्या 300 दहशतवाद्यांमुळे तालिबानला मोठा झटका बसला आहे.

थोडक्यात बातम्या 

“राणेंना सूक्ष्म उद्योग खातं मिळालं, त्यामुळे त्यांचं डोकंही सूक्ष्म झालं”

“आधी देश, मग पक्ष म्हणणाऱ्या भाजपने पक्षाच्या झेंड्याखाली देश गुंडाळला”

युद्धजन्य परिस्थितीतही चिमुरड्यांकडून एकमेकांवरील निस्वार्थ प्रेम, पाहा व्हिडीओ

“मोदींचा पराभव करता येतो हे महाराष्ट्र आणि बंगालने दाखवून दिलंय”

“तिसरी लाट येण्याची शक्यता खूप कमी, आलीच तर…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More