जिल्ह्यासाठी का होईना मी गृहमंत्री आहे- पंकजा मुंडे

जिल्ह्यासाठी का होईना मी गृहमंत्री आहे- पंकजा मुंडे

बीड | लोकांच्या मनातील मुख्यमंत्री असा पंकजा मुंडे यांचा उल्लेख त्यांचे कार्यकर्ते करत असतात. मात्र आज त्यांनी स्वतःला चक्क जिल्ह्याचं गृहमंत्री म्हणवून घेतलं. 

दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीच्या निमित्ताने गोपीनाथ गडावर महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबीराच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.

आमदार सुरेश धस यांच्या भाषणाचा धागा पकडत पंकजा मुंडे यांनी जिल्ह्यातील दहशत, दादागिरी, गुंडगिरी संपवल्याचा दावा केला.

आपण कोणालाही घाबरण्याची गरज नाही. चांगले काम करा आणि माझ्या पाठीशी राहा, असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, आज आपण जिल्ह्यासाठी का होईना गृहमंत्री असल्याचे सांगून त्यांनी गृहमंत्रीपदाची सुप्त इच्छा देखील बोलून दाखवली. 

महत्वाच्या बातम्या 

-खरं खरं सांगा, खरा फेकू कोण??? शत्रुघ्न सिन्हांचा सवाल

-पंतप्रधान नरेंद्र मोदींची खुर्ची धोक्यात; योगी आदित्यनाथांना पंतप्रधान करण्याची मागणी

-कोण होणार मध्य प्रदेशचा नवा मुख्यमंत्री?; आमदारांच्या उपस्थितीत काँग्रेसची खलबतं

-कतरिना कैफचा हॉट अंदाज; झिरो सिनेमातील ‘हुस्न परचम’वर प्रेक्षकांच्या उड्या

-नव्या गव्हर्नरचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले; सुब्रमण्यम स्वामींचा खळबळजनक आरोप

Google+ Linkedin