बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“तुमचं दुःख माझ्या ओटीत टाका आणि माझ्या चेहऱ्यावरील हसू तुम्ही घरी घेऊन जा”

मुंबई | केंद्रीय मंत्रिमंडळात खासदार प्रीतम मुंडे यांनी यांची वर्णी लागणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र प्रीतम मुंडे यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आलं. त्यामुळे पंकजा मुंडे समर्थकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यासोबतच काही पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामेही दिले होते. संबंधित पदाधिकाऱ्यांनी पंकजा मुंडेंची मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं.

काळ कधीच थांबत नसतो. तुमचं दुःख माझ्या ओटीत टाका आणि माझ्या चेहऱ्यावरील हसू तुम्ही घरी घेऊन जा. मला काय मिळालं नाही, अशा चिल्लर लढाईत मला पडायचं नाही. आज आपण धर्मयुद्ध टाळण्यासाठीच इथे उभे आहोत. तुम्ही सगळे माझे महारथी आहात, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना धीर दिला.

कौरव आणि पांडवातील युद्ध पांडवांनी जिंकण्याचं आणखी एक कारण होतं. कौरवांच्या सैन्यातील लोक मनाने पांडवांसोबत होते आणि शरीराने कौरवांसोबत होते. कळलं का तुम्हाला, त्यांच्या रथावर असलेले सारथीसुद्धा त्यांच्यासोबत नसतील, असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पंकजा मुंडेंनी आपल्या भाषणात, माझा नेता नरेंद्र मोदी, माझा नेता अमित शहा, माझा नेता जे.पी. नड्डा आहेत, असं म्हणाल्या. मात्र त्यांनी राज्यातील भाजप नेत्यांचा उल्लेख केला नाही. यामध्ये विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं नाव न घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांणा उधाण आलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

शेतकरी आंदोलनाच्या तोडग्यासाठी पावसाळी अधिवेशनादरम्यान शेतकरी संघटनांचं मोठं पाऊल

“भाजप बहुजन चेहरे वापरतो अन् नंतर बाजूला करतो, फडणवीस खोटारडे मुख्यमंत्री होते”

अभिनेत्री हेमांगी कवीच्या ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ पोस्टला प्रविण तरडेंचा पाठिंबा, म्हणाले…

‘कौरव कोण, पांडव कोण हे त्यांनीच ठरवावं’; ठाकरे सरकारमधील ‘या’ मंत्र्याचा पंकजा मुंडेंना टोला

“कधी-कधी कार्यकर्त्यांचा आक्रोश होत असतो, पण पंकजा मुंडे असे काही करणार नाहीत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More