Top News

मुंडे साहेबांना काही झालं असेल तर मी ‘त्यांचा’ जीव घेईन- पंकजा मुंडे

बीड |  माझ्या बापाला काही झालं असेल तर ज्यांनी केलं त्या माणसाचा मी जीव घेईन आणि माझ्या स्वत:चा जीव जागच्या जागी जाईल, असं वक्तव्य महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं आहे.

मुंडे साहेबांना काय झालंय हे जर माझ्या लोकांना माहित असेल तर त्यांचा जीव घेण्याची ताकद माझ्या लोकांमध्ये आहे, असंही त्या यावेळी बोलताना म्हणाल्या.

“लाज वाटली पाहिजे ह्या विरोधी पक्षातल्या लोकांना, माझ्या बापाच्या मृत्यूचं राजकारण करायला…”, असा घणाघात त्यांनी यावेळी विरोधी पक्षावर केला.

मी जर एक आवाज दिला तर पार मुंबई-दिल्लीपासून माझे लोक यायला तयार आहेत, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

मी मुंडे साहेबांची लेक आहे, मी हॅकर नाही, असं म्हणत त्यांनी मागच्यावेळी गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यू प्रकरणाच्या वादावर पडदा टाकला होता.

महत्वाच्या बातम्या-

उद्धव ठाकरे युतीचा निर्णय उद्या जाहीर करणार?? हालचालींना वेग

युतीसाठी भाजपकडून शिवेसेनेसमोर नवा फॉर्म्युला??

‘मास्तर धोनी’ चक्क मराठीतून मार्गदर्शन करतो तेव्हा…!

-तीन चार रुपयांमध्ये हॉटेलात कपभर चहा मिळतो का? -शरद पवार

“अण्णा तुम्ही सत्ताधारी नालायकांसाठी जीवाची बाजी लावू नका”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या