महाराष्ट्र मुंबई

शरद पवार UPA ला फायदा करुन देतील, पण …- पंकजा मुंडे

मुंबई | शरद पवार हे दिल्लीतील नेत्यांच्या भेटीगाठी घेत असतानाच त्यांच्याकडे विरोधी पक्षांचं म्हणजेच युपीएचं नेतृत्व दिलं जाऊ शकतं, अशी चर्चा रंगू लागली. यावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भाजपा नेत्या पंकजा मुंडेंनीही शरद पवार यांच्या अध्यक्षपदाचा युपीएला फायदा होईल, असं म्हटलं आहे. पंकजा मुंडे टीव्ही 9 मराठीशी बोलत होत्या.

शरद पवार हे संयुक्त पुरोगामी आघाडी म्हणजेच युपीएचे अध्यक्ष झाले तरी भाजपाला त्या निवडीचा काहीही फरक पडणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजप मजबूत आहे, मोदींचं नेतृत्व सक्षम आहे. मात्र, शरद पवार यांच्या नेतृत्वाचा युपीएला निश्चितच फायदा होईल, असं पंकजा मु़ंडे यांनी म्हटलंय.

शरद पवार यांचा अनुभव मोठा आहे, त्यांचे सर्वपक्षीय नेत्यांसोबतचे संबंध मैत्रीपूर्ण आहेत. त्यांच्या सोशल इंजिनिअरींगचा ते युपीएला फायदा करुन देऊ शकतात. पण, याची आम्हाला चिंता नाही. कारण भाजपला काहीही फरक पडणार नाही, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या-

‘या’ जिल्ह्यात पुढच्या 3 तासांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता!

भाजप आमदाराच्या पोस्टरवर एकनाथ खडसेंचा फोटो; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

फिटनेस चाचणीमध्ये रोहित शर्मा पास; ऑस्ट्रेलियाला होणार रवाना

‘काँग्रेसला संपवण्याचा हा एक मोठा कट आहे’; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप

लोकल ट्रेनचा प्रवास सर्वसामान्यांना थेट पुढच्या वर्षीच; मुंबई महापालिका आयुक्तांचे संकेत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या