बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“टीम देवेंद्र वगैरे असं आमच्याकडे नाही, मी-मी असं चालत नाही”

मुंबई | मंत्रिमंडळ विस्तारात प्रीतम मुंडे यांना केंद्रात मंत्रिपद न मिळाल्याने प्रीतम मुंडे यांच्यासह पंकजा मुंडेही नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत. या चर्चा सुरू असतानाच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत यावर स्पष्टीकरण दिलं आहे. मी आणि प्रीतम मुंडे नाराज नाही. चुकीच्या बातम्या पेरल्या गेल्या, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. यावेळी बोलताना त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधलाय.

टीम देवेंद्र वगैरे असं आमच्याकडे नाही, मी मी असं चालत नाही, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. तसेच टीम देवेंद्रमध्ये कोण कोण आहेत, हे मला माहिती नाही. भाजपला टीम देवेंद्र आणि टीम नरेंद्र हे मान्य नाही, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय.

मीपणा पक्षाला मान्य नाही, आमच्या संस्कृतीला मी-मी असं मान्य नाही. आमच्या पक्षात आम्ही-आपण असं मानतो, त्यामुळे टीम देवेंद्र आमच्या पक्षाला मान्य नाही. पक्षनिष्ठा माझ्या बापाने संस्कारात दिली आहे. पक्ष हे आमच्यासाठी नातं आहे, आपण ज्यांच्यावर प्रेम करतो, त्यांची संस्कृती काढणं माझ्या संस्कृतीत बसत नाही, असं त्या म्हणाल्यात.

भाजपामध्ये एक पद्धत आहे, त्याचप्रमाणे निर्णय घेतले जातात. सगळ्या राज्यांच्या बाबतीत वेगवेगळे निर्णय झाले होते. फक्त प्रीतम मुंडे नाही तर हिना गावित यांचंही नाव चर्चेत होतं. नव्या लोकांना संधी देण्यास काही हरकत नाही. नवीन चेहरे आले, त्यामुळे पक्षाची ताकद वाढणार, असं पक्षाच्या श्रेष्ठींना वाटत असेल, तर माझा त्यावर विश्वास आहे. पक्षाची ताकद वाढली, तर हा निर्णय योग्य ठरेल, असंही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.

थोडक्यात बातम्या- 

“मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतील सर्व भाजप नेत्यांना देवेंद्र फडणवीसांनी संपवलं”

…म्हणून मी नव्या मंत्र्यांचं अभिनंदन केलं नाही- पंकजा मुंडे

केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं नाराज का?; पंकजा मुंडे म्हणाल्या…

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये वाद?; नितीन राऊत, बाळासाहेब थोरात अचानक दिल्ली दरबारी

“पंकजाताई, ओबीसी जनगणनेच्या मागणीमुळे तुम्हाला मंत्रिपद दिलं नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More