बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

माझ्या बाबांचं स्मारक करु नका, पण ‘ही’ एकच गोष्ट करा; पंकजांची मुख्यमंत्र्यांना विनंती

बीड |  स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधलं आहे.

एकवेळ माझ्या बाबांचं स्मारक करु नका, पण मराठवाड्यातील माझ्या शेतकऱ्यांना प्रश्नांकडे लक्ष द्या. शेतकऱ्यांच्या गळ्यातील फासाचा दोर कायमचा दूर करा. शेतकऱ्यांना मुबलक पाणी मिळण्याची सोय करा, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.

गेल्या पाच वर्षात भाजप सरकारने गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाची एक विटही रचली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे स्मारकाच्या बांधणीची मागणी करण्याचा मला अधिकार नाही, असं म्हणत त्यांनी स्वपक्षाला चिमटा काढला आहे.

दरम्यान, पंकजा मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी एक दिवसाचं उपोषण करणार असल्याचं घोषीत केलं आहे. 27 जानेवारीला औरंगाबाद इथे होणाऱ्या उपोषणाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More