बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

परमबीर सिंहांना जोर का झटका; ‘त्या’ फाईलवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सही

मुंबई | माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांचा पाय वरचेवर खोलात जाताना दिसत आहे. परमबीर सिंह यांच्यामागे चौकशीचा ससेमीरा सुरू आहे. परमबीर सिंह यांच्या अडचणी इथेच संपल्या नाहीत, परमबीर सिंह यांचं निलंबन अटळ असल्याची चिन्हं आता दिसत आहेत.

राज्य सरकारने परमबीर सिंह यांच्या निलंबनाची प्रक्रिया सुरू केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी परमबीर सिंह यांच्या निलंबनाच्या प्रस्तावावर सही केली असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे परमबीर सिंह यांच्यावर लवकरच निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे. (Parambir Singh To Get Suspended)

परमबीर सिंह यांच्या निलंबनाचा प्रस्ताव आता केंद्र सरकारकडे पाठवला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. आयएएस अधिकारी देबाशीष चक्रवर्ती यांच्या नेतृत्वाखालील समितीने तपासानंतर काही सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार ही निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, गोरेगाव येथील वसुली प्रकरणात परमबीर सिंह यांना अनेकदा समन्स (Summons) बजावण्यात आले होते. अनेकदा समन्स बजावले तरीही परमबीर सिंह चौकशीसाठी हजर झाले नाहीत त्यामुळे त्यांना फरार घोषित करण्यात आलं. मुंबईत दाखल होताच सिंह यांच्यामागे चौकशीचा ससेमीरा सुरू असताना त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होण्याचीही शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या-

ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांचा मोठा निर्णय, आता खासगी फोटो आणि व्हिडीओ…

‘2024 मध्ये 300 खासदार निवडून येतील असं वाटत नाही’; काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याचा घरचा आहेर

बायकोचा वाढदिवस विसरणं पडू शकतं महागात; ‘या’ देशाने केलेला कायदा वाचून थक्क व्हाल

काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन

राज्यात मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More