बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पालकांनो सावधान! लहान मुलांना कोरोना होण्याची संख्या ‘इतक्या’ पटीने वाढली

पुणे | कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे वाढणारी रुग्णसंख्या पाहता चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. कोरोना रुग्णांची (Corona cases India) संख्या वेगाने वाढताना दिसत आहे. त्यातच मागील 24 तासातील कोरोना रुग्णांची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

कोरोनाचा संसर्ग लहान मुलांना मोठ्या प्रमाणावर होत असल्याचं पहायला मिळत आहे. अशातच पुण्यात सहा दिवसांत चारपट लहान मुले कोरोना बाधित झाल्याचं समोर आलं आहे.

1 डिसेंबर ते 11 जानेवारी या कालावधीत 0 ते 11 वयोगटातील 2488 मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. पुणे शहरात 0 ते 10 आणि 11 ते 20 वयोगटातील कोरोनाबधितांची संख्या सहा दिवसात चारपटीने वाढली आहे. त्यामुले पालकांनी मुलांची जास्त काळजी घेण्याची गरज आहे.

दरम्यान, कोरोनाच्या नवनवीन व्हेरियंट कहर माजवला आहे. आत्ताच आलेल्या ओमिक्राॅननचा वाढता संसर्ग पाहता लवकरच तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

थोडक्यात बातम्या – 

“गोड बोलण्यासाठी तिळगूळाची गरज नाही, आमचा कारभार उघड आहे”

पुढील 2-3 दिवस राज्यात थंडीचा जोर कायम, हवामान खात्याचा इशारा

मोठी बातमी! अजित पवारांच्या नावाने धमकीचा फोन, मागितली ‘इतक्या’ लाखांची खंडणी

Makar sankranti 2022: ओमिक्राॅनविरोधात रोगप्रतिकारशक्ति वाढवण्यासाठी तिळाचे लाडू सेवन करा

Omicron पासून बचाव करण्यासाठी आहारात ‘या’ गोष्टींचा करा समावेश

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More