दगडफेक करणाऱ्यांऐवजी अरुंधती रॉयला जीपला बांधून फिरवा!

नवी दिल्ली | काश्मीरमध्ये दगडफेक करणाऱ्यांऐवजी अरुंधती रॉयला जीपला बांधा, असं ट्विट अभिनेते परेश रावल यांनी केलंय. त्यांच्या या ट्विटमुळे नव्या वादाला तोंड फुटलंय.

काश्मीरमध्ये दगडफेक करणाऱ्या एका तरुणाला लष्कराने जीपला बांधून फिरवले होते. लष्कराच्या या कारवाईवरुन मोठा वाद निर्माण झाला होता. मात्र परेश रावल यांनी आता यासंदर्भात ट्विट केल्याने नवा वाद सुरु झाला आहे.