पार्थ पवार-श्रीरंग बारणे मावळ जिंकण्यासाठी एकाचवेळी तुकोबारायांचे आशीर्वाद घ्यायला देहूत!

पुणे |  निवडणुका म्हटलं की देवाच्या पायावर माथा टेकवणं आलचं. मग दोन प्रतिस्पर्धी एकाच वेळी एकाच मंदिरात आले तर…… मावळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार आणि शिवसेनेचे संभाव्य उमेदवार श्रीरंग बारणे यांच्याबाबतीतही असंच काहीस झालं.

आज तुकाराम बीजेचं औचित्य साधत मावळचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार आणि शिवसेनेचे संभाव्य उमेदवार श्रीरंग बारणे एकाचवेळी तुकाराम महाराजांचे आशीर्वाद घेण्यासाठी देहूत आले होते.

लोकसभेत आपल्याला दणदणीत यश मिळावं म्हणून या दोघांनीही तुकोबांच्या चरणी माथा टेकवला.

दरम्यान, पार्थ पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून मावळ लोकसभेच्या रिंगणात आहेत. तर संभाव्य उमेदवार म्हणून श्रीरंग बारणे यांचं नाव आघाडीवर आहे.

महत्वाच्या बातम्या-

काँग्रेस नेता म्हणतो, पुलवामा सारखे हल्ले होतातच, त्यासाठी ‘पाक’वर एअर स्ट्राईक करणे चुकीचे

मुलं मुलींकडे नाय पाहणार मग कुणाकडं पाहणार?- उदयनराजे भोसले

-गौतम गंभीर भाजपसाठी बॅटिंग करणार, केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश

-‘त्याने’ चोप चोप चोपलं, 25 चेंडूंत शतक ठोकलं!

-मी पुरुषांसोबत झोपत नाही, केआर रमेश कुमार यांचं वादग्रस्त वक्तव्य