बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पार्थ पवार फाऊंडेशन तर्फे दीड लाख मास्क वाटप; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये जनजागृती

पुणे | कोरोना व्हायरसपासून सुरक्षेसाठी पार्थ पवार फाउंडेशन तर्फे आज सकाळी हडपसरमध्ये दहा हजार मास्क वाटप करण्यात आले. त्याच बरोबर पुणे, पनवेल, कर्जत, मावळ, खोपोली, खालापूर, उरण, बारामती अशा ठिकाणी हजारो मास्क वाटप करण्यात आले.

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलेले आहे. आतापर्यंत कोरोनाचे जगात सहा हजारहून अधिक बळी गेलेले असतानाच कोरोनापासून बचाव करण्यासाठी सर्वच देशांत प्रचंड काळजी घेतली जात आहे. कोरोनाचा शिरकाव भारतात तसंच महाराष्ट्रात देखील झाला आहे.

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून कोरून व्हायरसच्या रुग्णांची वाढ होत आहे. पुण्यात कोरोनाचे एकूण 18 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे पुण्यातील नागरिकांनमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापासून वाचण्यासाठी सरकार व पुणे महापालिकेतर्फे पूर्णपणे काळजी घेतली जात आहे.

दरम्यान, सार्वजनिक ठिकाणची गर्दी टाळण्यासाठी मॉल, दुकाने, मंदिर बंद ठेवण्यात आली आहेत. तसंच नागरिकांनी देखील गरज नसल्यास घराबाहेर न पडण्याचं आवाहन प्रशासन करत आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

कोरोनाला पिटाळण्यासाठी कैदीही झाले सज्ज; तयार करणार लाखो मास्क!

“…तर नाईलाज झाल्यास कठोर निर्णय घेऊ- राजेश टोपे

महत्वाच्या बातम्या-

कोरोनाने उभी बाटली केली आडवी; 31 मार्चपर्यंत पुण्यातली दारूची दुकाने बंद!

महागडे सॅनिटायझर खरेदी करू नका आणि मास्कही वापरू नका; तुकाराम मुंढेंनी सांगितल्या सोप्या टिप्स

“50 टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम न दिल्यास कंपनीवर कारवाई करणार”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More