चुकीनेच माणूस शिकतो… ‘पार्थ यांनी शरद पवारांचं वाक्य सार्थ ठरवलं’

पिंपरी चिंचवड | शांतता… सुरू करू….??? नमस्कार मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही…. या शब्दांनी सुरू झालेलं भाषण अगदी पंतप्रधान मोदींच्या गुजरात मॉडेलवर धडका मारून आलं आणि आपल्या 4 मिनिटांच्या भाषणात पिंपरी चिंचवडचा विकास, तरूणाई, मोदी सरकार यांच्यावर पार्थ पवार यांनी भाष्य केलं.

आपल्या पहिल्या वहिल्या अडखळलेल्या भाषणानंतर पार्थ पवार यांचं दुसरं भाषण मात्र आत्मविश्वासाने भारलेलं होतं. कुठलाही कागद हातात न घेता त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

मोदी गुजरात मॉडेल घेऊन संबंध भारतभर फिरत असतात मग आपण पिंपरी चिंचवड मॉडेल घेऊन महाराष्ट्रभर फिरू शकत नाही का?, असा सवाल त्यांनी विचारला.

शेवटी चुकांनीच माणूस घडतो… हेच शरद पवारांचं वाक्य पार्थ पवार यांनी मनावर घेतलं असावं.

महत्वाच्या बातम्या-

बारामतीतून उमेदवारी का मिळाली??? सांगतायेत कांचन कुल….

नातू पार्थ पवार म्हणतात, आपल्याला आजोबांना पंतप्रधान करायचं आहे…

राहुल गांधींच्या सभेने बंगालमधील वातावरण झालंय टाईट….!

सुनील तटकरे खा.गीतेंना म्हणतात, जनाची नाही पण मनाची तरी लाज बाळगा…

सुजय विखेंच्या भाजप प्रवेशावर महादेव जानकरांचा नवा गोप्यस्फोट!