लष्कर-ए-तोयबा आणि हाफिज सईदचा मी कट्टर समर्थक!

Parvez Mushrraf
परवेझ मुशर्रफ

इस्लामाबाद | लष्कर-ए-तोयबा आणि त्याचा म्होरक्या हाफिज सईदचा मी कट्टर समर्थक आहे, तसंच मीही त्यांचा लाडका आहे, असं खळबळजनक वक्तव्य पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांनी केलंय.

भारतीय लष्कराविरोधात जम्मू-काश्मीरमध्ये होणाऱ्या कारवायांचं मुशर्रफ यांनी समर्थन केलंय. मुंबईवरील 26/11च्या हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदचा काश्मीरमधील कारवायांमध्ये सहभाग असल्याचं सांगत त्यांनी त्याचंही समर्थन केलंय.

पाकिस्तानमध्ये लष्कर-ए-तोयबाला बंदी घालण्यात आलीय. आश्चर्ययाची बाब म्हणजे मुशर्रफ यांनीच ही बंदी घातलीय.