बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बेड मिळत नसल्याने ॲाक्सिजन सिलेंडरसह आंदोलन केलेल्या रुग्णांचा मृत्यू

नाशिक | कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्यानं वाढत चालला आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबादसारख्या शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. एका बाजूला नियम डावलून फिरणारे बेजबाबदार नागरीक आहेत. तर दुसऱ्या बाजूला आरोग्य यंत्रणेतील त्रुटी समोर येत आहे. अनेक रुग्णालय फिरुनही बेड मिळत नसल्यानं दोन कोरोनाग्रस्त रुग्ण नाशिक महापालिकेसमोरच काल आंदोलनाला बसले होते.

बुधवारी ऑक्सिजन सिलेंडरसह आंदोलन करणाऱ्या दोन कोरोनाबाधित रुग्णांपैकी एकाचा काल रात्रीच मृत्यू झाला आहे. रुग्णालयात बेड मिळत नसल्यानं महापालिका मुख्यालयात रुग्णानं आंदोलन केलं होतं. संबंधित कोरोना रुग्णाच्या आंदोलनानं महापालिका परिसरात एकच खळबळ उडाली होती. महापालिका प्रशासनानं ऑक्सिजन सिलेंडरसह आंदोलन करणाऱ्या व्यक्तीला बिटको रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र, मध्यरात्री बिटको रुग्णालयात संबंधित रुग्णाची प्राणज्योत मालवली होती.

या घटनेनंतर कोरोनाबाधित रुग्णाला आंदोलन करण्यासाठी महापालिकेत आणणाऱ्या व्यक्तींवर पालिकेकडून कारवाई होणार आहे. बेड मिळत नसल्यानं संबंधित रुग्णाला महापालिकेत आणणाऱ्या व्यक्तींवर सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, आंदोलन करणाऱ्या रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होत होता. अशा स्थितीत या दोन्ही रुग्णांनी महापालिकेसमोरच ठिय्या मांडला होता. प्रशासनाने या घटनेकडं गांभीर्यानं पहावं आणि लवकरात लवकर चांगल्या उपाययोजना करायला हव्या अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

थोडक्यात बातम्या

पुन्हा नशिबी फरपट? लॉकडाऊनची भीती, परप्रांतिय मजुरांची घराकडे जाण्यासाठी धावपळ!

धक्कादायक! भररस्त्यात तरूण उद्योजकाची गोळ्या घालून हत्या

धक्कादायक! पतीसमोरच तिघांनी केला महिलेवर सामुहिक बलात्कार

‘…हे पाहिल्यानंतर मी कधीही मास्क विसरणार नाही’; मुंबई पोलिसांनी दिलेल्या शिक्षेला आनंद महिंद्राही घाबरले

सुपरस्टार रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More