Top News कोरोना महाराष्ट्र मुंबई

सावधान! राज्यातील या दोन जिल्ह्यात सापडले कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे रुग्ण

Photo Courtesy-Pixabay

मुंबई | गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचं दिसतं आहे. ग्रामीण भागांसह राज्यातील प्रमुख शहरांमध्येही कोरोना व्हायरसची दहशत निर्माण होत आहे. अशातच राज्यातील दोन जिल्ह्यात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे रुग्ण सापडले आहेत. यवतमाळ आणि अमरावती या दोन जिल्ह्यात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे रुग्ण आढळून आले आहेत.

अमरावतीमध्ये चार रुग्णामध्ये एक E484k म्हणून स्ट्रेन आढळून आला आहे. तो स्पाईक प्रोटीनचा स्ट्रेन आहे. इंग्लंड आणि ब्राझीलच्या स्ट्रेनशी तो मिळताजुळता असून हा स्ट्रेन अधिक वेगाने पसरत असल्याची माहिती कोरोना टास्क फोर्स समितीचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी दिली आहे.

अकोला जिल्ह्यामध्ये या स्ट्रेनचा जास्त प्रभाव होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यवतमाळमध्ये N444 हा नवा स्ट्रेन आढळून आला आहे. हा नवा स्ट्रेन अधिक वेगात पसरू शकतो. त्यामुळे येत्या काळात शासनाला मिनी कन्टेन्मेट तसंच मायक्रो कन्टेन्मेट झोन करावे लागतील आणि त्या दृष्टीने निर्णय घ्यावे लागतील. त्याच अनुषंगाने अकोल्यात रविवारी लॉकडाऊन ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असंही डॉ. शशांक जोशी यांनी सांगितलं.

दरम्यान, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढत चालली आहे त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेच वातावरण तयार झालं आहे. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही नागरिकांना बाहेर पडताना मास्क लावून जा आणि आपले हात वारंवार सॅनिटाईझ करण्याचं आवाहन केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

संजय राठोड यांच्या चौकशीबाबत पुणे पोलिसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

शिवभक्त म्हणून माझाही हिरमोड झाला, पण…- अमोल कोल्हे

काही साप चावतात तर काही चावत नाही, त्यांना ठेचायचं असतं-उद्धव ठाकरे

ऐकावं ते नवलंच! गर्लफ्रेंडला प्रेग्नंट करून तिच्या आईसोबत बॉयफ्रेंडचं पलायन

अजितदादांच्या मनात काय चाललंय हे जाणून घेण्यासाठी ‘ती’ भााषा शिकणार- उद्धव ठाकरे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या