बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“लसीकरण मोफत असलं तरी लसीची किंमत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार”

सांगली | राज्यातील 18 ते 44 या वयोगटातील सर्वांना कोविड प्रतिबंधात्मक लस मोफत देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची घोषणा केली. मात्र ज्यांना शक्य आहे त्यांनी लसीची किंमत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मदत म्हणून द्या, असं आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मंत्री जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील यांनी केलंय.

प्रतीक पाटील यांनी स्वत:च्या लसीचे पैसे आणि इतर 5 जणांच्या लसीचे पैसे मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी लसीची किंमत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत द्यावे. सध्याच्या या कठिण काळात राज्याला मदतीची आवश्यकता आहे. त्यामुळे सर्वांनी हातभार लावण्याची गरज आहे, असं त्यांनी म्हटलंय. राज्याप्रती माझी जबाबदारी म्हणून मी ही भूमिका घेत असल्याचं प्रतीक पाटील यांनी सांगितलं आहे.

मी पैसे देण्यास सक्षम असलेल्या सर्वांना आवाहन करतो की, कृपया मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये लसीची रक्कम दान करा. ही रक्कम कोविड 19 संबंधित इतर कामांसाठी वापरली जाऊ शकते जसे की औषधे खरेदी करणे, ऑक्सिजन प्लांट्सची उभारणी करणे यासाठी मार्गी लागेल, असं आवाहन यापूर्वी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केलं आहे.

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या गंभीर परिस्थितीवर उपाय म्हणून लसीकरणावर मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे.

थोडक्यात बातम्या- 

गिरीश भाऊंना राजकारणात जन्माला मी आणलं, म्हणून आज…- एकनाथ खडसे

कोविशिल्ड लस झाली आणखी स्वस्त; अदर पूनावाला यांनी जारी केले नवे दर

…म्हणून मोफत लसीकरणाबाबतचं ते ट्विट डिलीट केलं; आदित्य ठाकरेंनी सांगितलं खरं कारण

‘तो फक्त पोरींचे फोन उचलतो’ म्हणणाऱ्या खडसेंना गिरीश महाजनांचं सडेतोड उत्तर, म्हणाले…

“केंद्र सरकारचा फाजील आत्मविश्वास ऑक्सिजन तुटवड्याला कारणीभूत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More