बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘पटोलेंच्या स्वबळाच्या नाऱ्याबद्दल मला काहीच माहीत नाही’; अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य

नांदेड | गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील सत्ताधारी पक्षांमध्ये चलबिचल असल्याचं दिसून येत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाची भाषा केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. तसेच त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर देखील गंभीर आरोप केले आहेत. यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसवर नाराज असल्याचं सांगितलं जात आहे.

पटोलेंच्या स्वबळाच्या नाऱ्यावर आता काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया देत कानावर हात ठेवले आहेत. नाना पटोले यांनी केलेल्या स्वबळाच्या नाऱ्याबाबत आपल्याला काहीही माहित नसल्याचं पटोले यांनी म्हटलं आहे. तसेच महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष टिकेल, असं देखील चव्हाणांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. आज ते नांदेडमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पटोलेंच्या स्वबळाच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. काल शरद पवार आणि काँग्रेस नेत्यांची सिल्वर ओकवर बैठक झाली. यावेळी त्यांनी ही नाराजी बोलून दाखवली आहे. वेगळेच लढणार असाल तर आधीच सांगा, आम्हालाही तयारीला लागता येईल, असं पवारांनी म्हटलं आहे.

पक्ष वाढवण्यासंदर्भात कोणाचंही दुमत नाही. परंतु सोबत असलेल्या पक्षांना दुखावणे योग्य नाही. वेगळे लढण्याचं जर दिल्लीवरून ठरलं असेल तर आम्हाला काही अडचण नाही किंवा नाना पटोलेंना अधिकार दिले असतील तर तसं सांगा, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या –

….म्हणून ओटीटीवरील बिग बाॅससाठी सलमान खानचा नकार

‘कोरोना नियमांमध्ये सूट नाही’; आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

गरिबांची लूट करणाऱ्या रेशन दुकानदारांना प्रशासनाचा दणका

शाब्बास पुणेकरांनो! कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्याने अखेर करुन दाखवलं, वाचा आजची आकडेवारी

‘महाविकास आघाडी सरकार पडणार नाही’; चंद्रकांत पाटलांंचं आचंबित करणार वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More