“पवार म्हणजे फक्त तडफड, पवारांना कुठेच जम बसवता आला नाही”
मुंबई | राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्याय उपलब्ध करण्याची गरज असल्याचं म्हटलं होत. त्यांच्या या वक्तव्यावर भाजप नेते निलेश राणे यांनी कठोर शब्दात टीका केली आहे. निलेश राणे यांनी ट्विट करून शरद पवारांच्या वक्तव्यावर ताशेरे ओढले आहेत. शिवाय त्यांनी ट्विटमध्ये पवारांची तुलना नरेंद्र मोदींसोबत केली आहे.
शरद पवारांनी भाजपवर टीका करत सध्यस्थितीत नरेंद्र मोदींना पर्याय म्हणून कोणाला तरी उभं करणं गरजेचं आहे. सध्या नरेंद्र मोदींना कोण पर्याय बनू शकतं किंवा विरोधी पक्षाचं नेतृत्व करणार हे महत्त्वाचं नाही. तर, सध्या विरोधकांनी एकत्र येणं अधिक गरजेचं आहे, असंही म्हणाले होते. पवारांच्या याच वक्तव्याला अनुसरून निलेश राणे यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली आहे.
निलेश राणे म्हणतात, “पवार म्हणजे फक्त तडफड, पवार साहेब केंद्रात किमान 25 वर्षे आहेत आणि मोदी साहेब 7 वर्षे तरी पवारांना कुठेच जम बसवता आला नाही, अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे. तसेच आंध्र प्रदेशचे सीएम 49 वर्षाचें, 25 पैकी 22 खासदार त्यांचे पण कधी ते नको ते उपद्व्याप करत नाहीत असं म्हणत त्यांनी पवारांना उद्देशून पवार साहेबांना आजही राजकारणात दुसऱ्याची मदत घ्यावी लागते, असा घणाघात निलेश राणेंनी केला आहे.
पवारांनी कालच अनिल देशमुखांच्या अटकेवरून भाजपवर निशाणा साधला होता. ते म्हणाले होते. अनिल देशमुखांना जो त्रास दिला जात आहे त्याचा एक एक मिनीट वसूल केला जाईल, असा इशारा त्यांनी दिला होता. त्याचबरोबर संजय राऊत यांनीही शरद पवारांच्या वक्तव्याला दुजोरा दिला होता. त्यामुळे शरद पवारांची यापुढची योजना नेमकी काय असणार? याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे.
पवार म्हणजे फक्त तडफड, पवार साहेब केंद्रात किमान २५ वर्ष आहेत आणि मोदी साहेब ७ वर्षा पासून तरी पवारांना कुठेच जम बसवतां आला नाही. अंद्रा प्रदेशचे CM ४९ वर्षाचे, २५ पैकी २२ खासदार त्यांचे पण कधी नको ते उपद्व्याप ते करत नाही. पवार साहेबांना आजही राजकारणात दुसऱ्याची मदत घ्यावी लागते pic.twitter.com/4nDr4yw7jK
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) November 18, 2021
थोडक्यात बातम्या-
“ठाकरे सरकार हे काळीज नसलेलं सरकार आहे”
“एसटी कर्मचारी उपाशीपोटी अन् आदित्य ठाकरेंची जनतेच्या पैशावर स्कॉटलंड वारी”
“तुम्ही या देशात आहात की परदेशात? तुमचा ठावठिकाणा आधी सांगा”
“मी प्रत्येक मुर्खाला पाठींबा द्यायला हवा का?”
“एसटी कर्मचाऱ्यांनी रक्त आटवणे म्हणजे भिंतीवर डोके फोडून घेण्यासारखे”
Comments are closed.