बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शिंदेंना मुख्यमंत्रीपद देताना दगड डोक्यावर ठेवला की छातीवर?”

पुणे | पनवेल येथे काल आयोजित कार्यक्रमात भाजपचे नेते आणि माजी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवडीवर खळबळजनक वक्तव्य केलं आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना केंद्रीय नेतृत्वाने मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला, तो आम्ही काळजावर दगड ठेऊन स्वीकारला. आम्हाला त्या निर्णायाचं दु:ख झालं, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि मविआ सरकारचे प्रणेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाष्य केलं आहे. तसेच शिंदे गटातील आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांचे उद्धव ठाकरेंवरील (Uddhav Thackeray) आरोप आणि रखडलेला मंत्रीमंडळ विस्तार यावर देखील पवार बोलले. पाटलांच्या वक्तव्यावर पवार म्हणाले, दगड छातीवर ठेवायचा की डोक्यावर ठेवायचा हा त्यांचा प्रश्न आहे. संपूर्ण सत्ता केंद्रीत करत दोघांनी सरकार चालवण्याचा घाट शिंदे यांनी घातल्याचं दिसतं, असंही पवार म्हणाले.

एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेवर बोलताना पवार म्हणाले, सुरक्षा कोणाला द्यायची याची चर्चा कॅबिनेटमध्ये होत नाही. मुख्य सचिव, गृह सचिव, पोलीस महासंचालक आदी लोकांची एक समिती असते, त्यांचा तो निर्णय असतो. गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने शिंदे यांना विशेष सुरक्षा देण्यात आली होती, असा खुलासा शरद पवारांनी केला आहे.

पुण्यातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात डॉ. श्रीमंत कोकाटे (Dr. Shrimant Kokate) लिखित शिवचरीत्र आणि विचारप्रवाह ग्रंथाचं प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते झालं. त्यावेळी तेथे छत्रपती शाहू महाराज, डॉ. श्रीमंत कोकाटे, डॉ. जयसिंगराव पवार, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ग्रंथ प्रकाशनानंतर पवार पत्रकारांशी बोलत होते.

थोडक्यात बातम्या – 

“आम्ही मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलंय”

…तर शुगर राहिल कंट्रोलमध्ये; डायबिटीस पेशंटसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी

कोरोना, डेंग्यूनंतर ‘या’ साथीचा धोका; अचानक रूग्णसंख्या वाढल्यानं आरोग्य यंत्रणा सतर्क

“न्यूड फोटो शेअर करण्याचं स्वातंत्र, मग हिजाब परिधान करण्याचं का नाही?”

“ऊस उत्पादकांमुळे शरद पवारांच्या पुतण्या आणि नातवांचे कारखाने निघाले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More