बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पवार- शहा भेटीच्या चर्चेवर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रफुल पटेल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची अहमदाबादमध्ये भेट घेतल्याचं खळबळजनक वृत्त समोर आलं. या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. आता या भेटीवर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार आणि अमित शहा यांची भेट झाली की नाही याची माहिती नाही. मात्र अमित शहा आणि शरद पवार यांच्या भेटीत चुकीचं काही नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. देशाच्या गृहमंत्र्यांना एखादा मोठा नेतो भेटतो यात चुकीचं काय आहे, असं राऊत म्हणाले.

राजकारणात कोणतीही बैठक गुप्त नसते. अनेक गोष्टी सार्वजनिक केल्या जात नाहीत. मात्र नंतर त्या सार्वजिनिक होतात, जसं की बंद खोलीतील चर्चा असो, असा टोला संजय राऊत यांनी अमित शहा यांना लगावला.

दरम्यान, गुजरातमधील एका वृत्तपत्राने प्रकाशित केले आहे की शरद पवार साहेब आणि प्रफुल्ल पटेल यांनी अमित शहा यांची भेट घेतली. गेल्या दोन दिवसांपासून ट्विटरवर अशा अफवा उडवल्या जात आहेत. अशी कोणतीही बैठक अद्याप झालेली नाही, असं स्पष्टीकरण राष्ट्रवादीने दिलं आहे. मात्र या भेटीनंतर राज्यात येत्या काळात नवीन समीकरणं तयार होणार का? महाविकास आघाडीची सत्ता जाणार का? असे अनेक प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहेत.

थोडक्यात बातम्या- 

महावितरणची थकबाकी हे भाजपचंच पाप आहे- नितीन राऊत

मोदींनी आदेश दिल्यास माझी ममतांच्या विरोधातही लढायची तयारी – मिथुन चक्रवर्ती

माजी IPS संजीव भट्ट यांच्या पत्नीची भावनिक साद, म्हणाल्या…

‘तुझ्या बॅटमध्ये स्प्रिंग आहेत का?’; षटकार मारल्यावर स्टोक्सनं शार्दुलची बॅट तपासली

‘ही’ प्रसिद्ध गायिका लवकरच करणार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More