आजच्या पार्थ पवार-लक्ष्मण जगताप भेटीने मावळमध्ये उलथापालथ घडणार?

पुणे |  आज (शनिवार) राष्ट्रवादीचे नेते आणि मावळचे उमेदवार पार्थ पवार आणि आमदार लक्ष्मण जगताप यांची पिंपरी चिंचवडमध्ये भेट झाली. या भेटीने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

लक्ष्मण जगताप यांचा शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांना विरोध आहे. स्वत: जगताप शेवटपर्यंत मावळमधून इच्छुक होते.

बारणेंचा प्रचार आम्ही करणार नाही, असा पवित्रा जगतापांच्या समर्थकांनी घेतला आहे. आता पार्थ यांच्या भेटीने जगतापांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, आझन पानसरेंच्या मुलाने राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने आघाडीची ताकद वाढली आहे.

महत्वाच्या बातम्या-

अखेर अब्दुल सत्तारांनी दिला काँग्रेसचा राजीनामा, औरंगाबाद लोकसभा अपक्ष लढवणार

अशोक चव्हाण म्हणतात, काँग्रेस पक्षात माझं कुणी ऐकत नाही!

पार्थच्या विजयासाठी पवार कुटूंबिय मावळच्या मैदानात!

शिरोळे म्हणतात, माझ्यापेक्षा जास्त मताधिक्याने बापटांना निवडून आणणार…

महादेव जानकरांनी केलेत निवडणुकीच्या तोंडावर गौप्यस्फोट!