बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“करावं तसं भरावं, त्यामुळे राष्ट्रवादीने ईडीच्या कारवाईवर राजकारण करू नये”

मुंबई | शंभर कोटीच्या वसुली प्रकरणी माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या घरी आज ईडीने  छापेमारी केली आहे. यावरून विरोधी पक्ष आणि राज्य सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. या सगळ्याला भाजप जबाबदार असल्याचे आरोप राष्ट्रवादीकडून केले जात आहे. राष्ट्रवादीच्या या आरोपांवर भाजपचे नेते आणि आमदार नारायण राणे यांनी राष्ट्रवादीला प्रत्युत्तर दिलं आहे.

ईडीची कारवाई ही राजकीय कारवाई नाही त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने तर यावर राजकारण करूच नये, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे. नारायण राणे यांन प्रसार माध्यमांशी संवाद साधला.  करावे तसे भरावे या प्रमाणे आता भरण्याची वेळ आली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

तसेच जे काही गुन्हे घडले आणि अटक झालेल्या लोकांनी जी काही माहिती दिली त्या आधारांवर ही सगळी चौकशी सुरू आहे. हे आरोप सिद्ध झाले की मग बघूया असंही राणे म्हणाले आहेत.

दरम्यान, याच मुद्यावरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काही दिवसांनी अनिल देशमुख यांची रवानगी जेलमध्ये होणार असल्याचं म्हटलं होतं. त्याचप्रमाणे अनिल परब आणि मिलिंद नार्वेकर यांचीही सीबीआय चौकशी करण्याची मागणी सोमय्या यांनी केली आहे. अनिल देशमुख यांच्याप्रमाणेच अनिल परब यांची अवस्था होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“केंद्र सरकार आपल्या कर्तव्यात चुकल्यामुळेच ओबीसी आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द ठरविले”

रिया चक्रवर्ती पुन्हा एकदा मैदानात! अमेरिकन पाॅप स्टार ब्रिटनी स्पीअर्सच्या स्वातंत्र्यची मागणी

कोरोनाच्या घातक डेल्टा प्लस विषाणूने या जिल्ह्यात पहिला बळी; आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती

“अनिल परब आणि मिलिंद नार्वेकर यांचीही सीबीआयने चौकशी करावी”

पुणेकरांना दिलासा नाहीच; सोमवारपासून ‘हे’ निर्बंध लागू

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More