Top News महाराष्ट्र मुंबई

“जनतेच्या मनात उत्सुकता आहे की ठाकरे परिवाराचा मूळ व्यवसाय काय आहे?”

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांचे पुत्र आदित्य यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात आपल्या संपत्ती संदर्भात दिलेली माहिती तसेच रश्मी ठाकरे यांच्या जमीन खरेदीबाबत उपलब्ध झालेली कागदपत्रे पाहता ठाकरे कुटुंबाचा व्यवसाय जमीन खरेदीचा की इमारती बांधण्याचा आहे याबाबत मुख्यमंत्र्यांनी एकदा स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलीये. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

उद्धव ठाकरे यांच्या प्रतिज्ञापत्रात पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावावर असलेल्या खालापूर तालुक्यातील वैजनाथ येथील जमिनीचा उल्लेख आहे. या जमिनीचा उल्लेख करताना एकाच सर्व्हे क्रमांकाच्या जमिनीचा उल्लेख दोन वेळा करण्यात आला आहे. हा प्रकार संशयास्पद असल्याने मुख्यमंत्री ठाकरे यांनीच याबाबत खुलासा करणं आवश्यक आहे, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

आदित्य ठाकरे हे 31 मार्च 2020 पर्यंत हिबिस्कस फूड एलएलपी, एलिओरा सोलर एलएलपी या कंपन्यांचे डेझिग्नेटेड पार्टनर होते असे दिसते आहे. मंत्री बनल्यावर जवळपास 4 महिने ते एखाद्या कंपनीचे संचालक म्हणून कसे राहू शकतात? कंपनीचा डेझिग्नेटेड पार्टनर हे पद लाभाचे नाही का? याबाबत मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावं, असं सोमय्या म्हणालेत.

दरम्यान, ठाकरे परिवाराचा बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कंपनी किंवा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी मध्ये भाग आहे का? पार्टनरशिप आहे का? असा सवाल देखील सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

विधान परिषदेची निवडणूक महाविकास आघाडी लढवणार!

वीजबील माफीवरून मनसे आक्रमक, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा 21 फूटांचा पुतळा जाळणार!

भारतात फेब्रुवारीपासून कोव्हिशील्ड लसीच्या वितरणाला सुरुवात; ‘इतक्या’ रूपयांमध्ये मिळणार लस

‘अमृता फडणवीसांच्या गाण्याचा आशय सुंदर’; ‘या’ काँग्रेस नेत्याकडून कौतुक

“माझे कुटुंब माझी जबाबदारीच्या यशानंतर ठाकरे सरकारची नवीन योजना, माझे लाईट बिल माझी जबाबदारी”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या